भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार; ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ लवकरच ताफ्यात दाखल होणार

भारतीय नौदलासाठी MH-60 रोमियो हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे.

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार; 'MH-60 रोमियो हेलिकॉप्टर' लवकरच ताफ्यात दाखल होणार
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 3:42 PM

मुंबई : भारतीय नौदलासाठी (Indian Navy) MH-60 रोमियो (MH-60R) हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरीकन कंपनी लॉकहिड मार्टिनने (Lockheed Martin) शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त (Indian Navy Day 2020) ‘MH-60 रोमियो या हेलिकॉप्टर’चा फोटो शेअर केला होता. (MH 60R Helicopter ready for Indian Navy with best attacking features)

हिंद महासागरात चीनचं सामर्थ्य वाढलं आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने अमेरीकन कंपनी लॉकहीड मार्टिनशी संपर्क करुन या हेलिकॉप्टरसाठीचा करार केला आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीला 24 हेलिकॉप्टर बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर असणार आहे. यामध्ये असे काही फिचर्स आहेत, जे यापूर्वी कोणत्याही लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर आधीपासूनच करत आहे.

हे हेलिकॉप्टर खास नौदलासाठी डिझाईन केलं जात आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यात आणि ते त्या पाणबुड्या नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक असे रडार आहेत ज्याद्वारे खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्या शोधता येतील आणि त्यांना लक्ष्य करुन त्या उद्ध्वस्त करता येतील.

या हेलिकॉप्टरमध्ये हेल्प फायर मिसाईल्स, MK-54 टॉरपिडो आणि रॉकेटदेखील आहे. ही हत्यारं शत्रूच्या युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहेत. MH-60 रोमियो हेलिकॉप्टर वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. जेणेकरुन MH-60 रोमियो हेलिकॉप्टरमध्ये SH-60 B आणि SH-60 F हेलिकॉप्टर्सच्या फिचर्सचा समावेश करता येईल.

हे हेलिकॉप्टर उडवणारा पायलट रात्रीच्या गडद अंधारातही अचूकपणे लक्ष्यभेद करु शकतो. हे हेलिकॉप्टर तब्बल 2700 किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकतं. या फायटर हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन देण्यात आले आहेत. ज्यामुळे हे हेलिकॉप्टर तब्बल 330 किमी प्रति तास वेगाने उडू शकतं. या हेलिकॉप्टरची रेंज 830 किलोमीटरपर्यंत आहे.

MH-60 रोमियो या हेलिकॉप्टरचा वापर भारतीय नौदल सुरक्षेसह दळणवळण, मेडिकल सुविधा पुरवणे, रेस्क्यू ऑपरेशनसाठी करु शकतं. हे एक मल्टिटास्किंग लढाऊ हेलिकॉप्टर सिद्ध होईल. लॉकहिड मार्टिनने शेअर केलेला फोटो हा मॅन्यूफॅक्चरिंग फर्ममधील आहे. लवकरच हे हेलिकॉप्टर तयार होईल आणि भारतीय नौदलात त्याचा समावेश केला जाईल.

संबंधित बातम्या

‘आयएनएस कवरत्ती’ नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार, काय आहेत या युद्धनौकेची वैशिष्ट्ये?

भारतीय सैनिकांची माणुसकी, रस्ता भरकटलेल्या चिनी सैनिकाला परत पाठवलं

(MH 60R Helicopter ready for Indian Navy with best attacking features)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.