MNS-BJP | अमित शाह यांच्यापूर्वी विनोद तावडे यांची राज ठाकरेशी चर्चा; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते, अमित शाह यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे कालच रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र अमित शाह यांची भेट घेण्यापूर्वी विनोद तावडे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

MNS-BJP | अमित शाह यांच्यापूर्वी विनोद तावडे यांची राज ठाकरेशी चर्चा; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 12:29 PM

नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. आता आणखी एक नवीन युती आकाराला येण्याची शक्यता आहे. दिल्लीत कालपासून हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते, अमित शाह यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे कालच रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र अमित शाह यांची भेट घेण्यापूर्वी विनोद तावडे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी पोहोचले आहेत.

राज ठाकरे हे हॉटेल मानसिंगमध्ये उतरले आहेत. राज यांच्यासोबत मनसेचा एकही नेता नाही. याच हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडही उतरले आहेत. रात्री राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली नाही. त्यामुळे सकाळीच विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि लोकसभेच्या जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना कोणत्या आणि कुठून जागा सोडायच्या यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी केव्हा होणार हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भेटीआधी हालचालींना वेग आला आहे. विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांच्यात काय चर्चा झाली समजू शकलेली नाही. मात्र भाजप आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. पुढच्या काही वेळातच राज ठाकरे आणि विनोद तावडे हे हॉटेलमधून बाहेर येतील. आणि ते दोघेही थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी जातील अशी माहिती मिळत आहे. मनसे अखेर महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये शिक्कामोर्तब देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र त्यावर अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी नेत्यांकडून थोड्याच वेळात याबाबत चित्र स्पष्ट होईल.

राज ठाकरे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले. कालच ते अमित शाह यांची भेट घेतील असं सांगितलं जात होतं. आज सकाळी त्या दोघांची भेट होईल असंही बोललं जात होतं. त्याप्रमाणे आता थोड्याच वेळात त्यांची बैठक होणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे राज ठाकरेंचा ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे, त्याच ठिकाणी दाखल झाले. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झालीय आता विनोद तावडे आणि राज ठाकरे हे दोघेही अमित शाह यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा दिल्या जातात, मनसेकडून किती जागांची मागणी केली जाते हे पाहणंही महत्वाचं ठरेल.

अडीच वाजता अमित शाह यांच्याशी भेट

राज ठाकरे यांची आज दुपारी अडीच वाजता भाजपचे नेते अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचा एकही नेता नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेला मुंबईतील जागा मिळणार ?

दरम्यान, राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात असा कयास लढविला जात आहे. याशिवाय राज ठाकरे यांना पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही जागा मिळतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिल्यांदाच युती

दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली. त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चालो रे राहिली आहे. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज या महायुतीत येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.