लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 3:20 PM

कल्याण : राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आल्यामुळे मुंबईत बेस्ट बस सुरु झाल्या आहेत. तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. तर मरिन ड्राईव्ह आणि चौपट्यांवर गर्दी होतानाचं चित्र आज ठिकठिकाणी पाहायला मिळालं. यावरुन राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनवर मनसे आमदार राजू पाटील टीका केली आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

“तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही,” असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

या ट्विटसोबत त्यांना मरिन ड्राईव्ह, रस्त्यावरील ट्राफिक आणि अनेक लोकांच्या रांगा लागलेले फोटो ट्विट केले आहेत.

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय, राज ठाकरेंचा सवाल

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारला होता.

लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही, असे राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले  होते. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.