AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावाने भरले लाडकी बहीण योजनेचे 100 टक्के अर्ज; फक्त एकच आयडिया वापरली अन्…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा या गावाने आदर्श घ्यावा अशी कामगिरी राज्यातील एका गावाने केली आहे. त्यामुळे 100 टक्के अर्ज भरणारे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. या गावाने असे काय केले की महिलांनी कौतूक सुरु केले आहे.

या गावाने भरले लाडकी बहीण योजनेचे 100 टक्के अर्ज; फक्त एकच आयडिया वापरली अन्...
mukhyamantri ladki bahin yojanaImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 13, 2024 | 8:19 PM
Share

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांच्या बॅंक खात्यात दर महिन्याला थेट 1500 रुपये जमा होणार असल्याने महिला वर्गाने या योजनेचे जोरदार स्वागत केले आहे. या योजनेसाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने गावा-गावात योजनेची नोंद करण्यासाठी महिलांची अक्षरश:झुंबड उडाली आहे. या योजनेतील बहुतांशी जाचक अटी शिथील झाल्या आहेत. अडीच लाख वार्षिक उत्पन्नाची अट रद्द झाल्याने तसेच रेशनिंग कार्डला आधारभूत मानल्याने या योजनेसाठी मोठी नोंदणी सुरु झाली आहे. या योजनेचे नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर देखील प्रयत्न सुरु असताना एका गावाने तर कमालच करीत गावात 100 टक्के नोंदणी पूर्ण केली आहे. डोमिसाईलची अट देखील

बुलढाणा येथील ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ या योजनेत राज्यातील एका गावाने कमालच केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे 100 टक्के अर्ज भरणारे हे राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. शेंदला गावातील महिलांनी शंभर टक्के ऑफलाईन अर्ज भरले आहेत. श्री संत गजानन महाराज सेवा समितीचा यासाठी पुढाकार घेतला. आणि गावातच सर्व विभाग एकत्र आणले. त्यामुळे एकाच छताखाली सर्व कामे पटापट उरकण्यात आली.त्यामुळे महिलांना देखील विविध यंत्रणाच्या मागे धावावे लागले नाही. या गावातील महिलांनी श्री संत गजानन महाराज संस्थेचे आभार मानले आहेत.

सर्व कागदपत्रांची दिली मोफत सेवा ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शंभर टक्के अर्ज भरणारे शेंदला हे राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. बुलढाणा येथील मेहकर तालुक्यातील शेंदला हे गाव या योजनेसाठी आदर्श ठरले आहे. गावातील संत श्री गजानन महाराज सेवा समितीने मोठे काम केले आहे. या समितीने गावातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला लागणारे सर्व कागदपत्रांसह झेरॉक्स मशीन सुद्धा एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली. तलाटी कार्यालयच गावात आल्याने सर्व विभाग एकाच छताखाली आले. रिणामी अर्ज भरताना रांगा लावण्याचा महिलांचा वेळ, पैसा, आणि त्रास देखील वाचला आहे. मात्र  470 महिलांना पैकी 30 टक्के महिलांना ऑनलाईन अर्ज भरताना त्रास होत आहे. संत गजानन महाराज सेवा समितीच्या या उपक्रमाचा ग्रामस्थांनी सुद्धा कौतुक केले आहे. महिलांनी देखील या संस्थेचे आभार मानले आहेत.

नागपूरात लागले होर्डिंग

नागपूर शहरातील सहाही विधानसभेत ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने‘चे होर्डिंग्ज उभारले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहिण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  महिला आणि बालकल्याण विभागातर्फे हे होर्डींग बसविण्यात आले आहेत.  नागपूरातील 6 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या प्रसारासाठी लागली आहे. शनिवार आणि रविवारी देखील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ॲाफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.