मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागात 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाचा 'सचिन वाझे' कोण? असा खोचक सवालही साटम यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजपकडून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचं आल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागात 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा गंभीर आरोप
भाजप आमदार अमित साटम यांचा मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप

मुंबई : वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपकडून सातत्याने गंभीर आरोप करण्यात येत आहे. आता मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागात 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाचा ‘सचिन वाझे’ कोण? असा खोचक सवालही साटम यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजपकडून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचं आल्याचं पाहायला मिळत आहे. (Amit Satam alleges Rs 5,000 crore scam in Mumbai Municipal Corporation’s fire department)

‘मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागतील पाच हजार कोटीचा घोटाळा उजेडात आला आहे आणि आता सत्तेतील बसूलीबाज ३ मार्च २०१४ ते जून २०२१ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने रहिवासी/सोसायट्यांकडून अग्निशमन सेवा शुल्क वसूल करण्याचे परिपत्रक काढून कारस्थान करत आहे. मुळात बांधकाम परवानगी देतानाच अग्नीशमन सेवाशुल्क विकासकांकडून न आकारतात पण सेना वसूली टोळीने डोळेझाक करण्याची टक्केवारी विकासकांडून स्वत:करिता वसूल केली. अग्नीशमन दलाचा सचिन वाझे कोण?’ असा सवाल साटम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारलाय.

अग्नीसुरक्षा शुल्काबाबत महापालिकेचा निर्णय काय?

मुंबई महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्नीसुरक्षा शुल्क आकारणार आहे. 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे हे पैसे आकारले जाणार आहेत. कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर, पाणी पट्टीतील वाढीला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय.

2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून ‘अग्नीसुरक्षा शुल्क’ घेण्यात येणार असून प्रति चौरस मीटर सुमारे 10 ते 15 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाणार आहे. तर ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर

नवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार!

Amit Satam alleges Rs 5,000 crore scam in Mumbai Municipal Corporation’s fire department

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI