AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार

कंगना रनौतला मुंबई पोलीस चौकशी बोलवणार आहेत. कंगनाला मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे.

Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार
| Updated on: Oct 21, 2020 | 8:22 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) मुंबई पोलीस चौकशी बोलावणार आहेत (Mumbai Police Notice). येत्या सोमवारी (26 ऑक्टोबर) तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी क्रमश: चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे (Mumbai Police Notice).

17 ऑक्टोबरला कंगनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले.

याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावले आहे. ती सध्या हिमाचलमध्ये तिच्या घरी आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तिला व्हॉट्सअ‍ॅपवरुन चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे (Mumbai Police Notice).

कंगनासह बहीण रंगोलीवरही गुन्हा दाखल

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Police Notice

संबंधित बातम्या :

Kangana Ranaut | ‘इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येतेय’, नव्या एफआयआरवर कंगनाची प्रतिक्रिया!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.