नागपूर मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची पक्षबांधणी, नव्या टीमसह भाजपला रोखणार?

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत (Nagpur Shivsena Newly appointed Leader for election)

नागपूर मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची पक्षबांधणी, नव्या टीमसह भाजपला रोखणार?
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 8:34 AM

नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. यात नागपूर सहसंपर्क प्रमुखपदी शेख सावरबांधे आणि सतिश हरडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्यावसायिक प्रमोद मानमोडे यांची प्रभारी महानगरप्रमुख म्हणून वर्णी लागली आहे. मात्र शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांना यातून वगळण्यात आले आहे. (Nagpur Shivsena Newly appointed Leader for election)

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष आहे. पण गेल्या काही दिवसांपासून नागपुरात शिवसेना चांगलीच सक्रीय झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार नागपूर महानगरातील प्रभारी महानगप्रमुखपदी व्यावसायिक प्रमोद मानमोडे तर नागपूर दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमच्या महानगर संघटकपदी मंगेश काशीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर पश्चिम आणि मध्यसाठी महानगर संघटक म्हणून किशोर पराते, नागपूर उत्तर आणि पूर्वसाठी विशाल बरबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर नागपूर मध्य, दक्षिण आणि दक्षिण पश्चिम या भागातील शहरप्रमुख म्हणून दीपक कापसे तर नागपूर उत्तर, पूर्व आणि पश्चिमसाठी नितीन तिवारी यांची वर्णी लागली आहे.

त्याशिवाय नागपूर उत्तरमधील उपमहानगरप्रमुख म्हणून बंडू तलवेकर, नागपूर पूर्वमधून गुड्डू रहांगडाले, नागपूर पश्चिममधून दिगंबर ठाकरे यांची वर्णी लागली आहे.

तर सहसंपर्कप्रमुख म्हणून सतीश हरडे, शेखर सावरबांधे आणि किशोर कुमेरिया यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांना मात्र या नियुक्त्यातून डावलण्यात आलं आहे. (Nagpur Shivsena Newly appointed Leader for election)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं

अमेरिकेतून काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये, 11 वीतील विद्यार्थी 17 व्या मजल्यावरुन कोसळला

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.