निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने खळबळ

'महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले जाते' असे राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या.(women representation in politics)

  • Publish Date - 1:56 pm, Wed, 13 January 21
निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट, रेखा शर्मांच्या विधानाने खळबळ

हैदराबाद :महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते,’ असं खळबळजनक विधान राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केलं. त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. (National womens commissions president on women’s representation in politics)

महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं

यावेळी बोलताना रेखा शर्मा यांनी महिलांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यांनी सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे सांगितले. मात्र ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तिकीट वाटपावर प्रश्नचिन्ह

यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीत महिलांना डावललं जाण्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो असं त्यांनी म्हटलंय. तसेच महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत महिलांना डावललं जातं,” असं म्हणत त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, “ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते,” असं निरीक्षण त्यांनी नोंदवत त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

“देव तारी त्याला कोण मारी”, रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी दिले जीवनदान

‘त्यांनी’ही इतिहास घडवला; भारताच्या महिला वैमानिकांचे ऐतिहासिक उड्डाण!

सांगोल्यातील ‘मेथवडे’च्या ग्रामस्थांनी घडवला इतिहास, ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या “चाव्या” नवदुर्गांच्या हाती

(National womens commissions president on women’s representation in politics)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI