AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याचा बहाणा, नवी मुंबईत वृद्धाची साडेपाच लाखांना फसवणूक

पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला (Navi Mumbai Old Person Cheated through Paytm App) आहे.

पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याचा बहाणा, नवी मुंबईत वृद्धाची साडेपाच लाखांना फसवणूक
| Updated on: Jul 26, 2020 | 4:49 PM
Share

पनवेल : पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या टोळीने या नागरिकाला 5 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच याची तपासणीही सुरु केली आहे. (Navi Mumbai Old Person Cheated through Paytm App)

या प्रकरणी फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव टी. लक्ष्मण वेकंटेश्वर राव (63) असे आहे. ते आपल्या कुटुंबासह तळोजा फेज 1 मध्ये राहतात. लॉकडाऊनमुळे दैनंदिन घरगुती सामान तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी आपल्या मोबाइलवर पेटीएम अॅप डाऊनलोड केले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मात्र त्यांना ते अॅप कसे वापरतात याबाबत त्यांना माहिती नव्हती. याचदरम्यान, पेटीएम कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्या व्यक्तीने त्यांची समस्या तो सोडवू शकत नसल्याचे सांगत वरिष्ठ अधिकारी त्यांना संपर्क साधतील असे सांगितले.

त्यानंतर काही वेळातच आर.के.शर्मा नावाच्या व्यक्तीने पेटीएममधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत टी. वेंकटेश्वर यांच्याशी संपर्क साधला. शर्मा यांनी टी.वेंकटेश्वर यांना पेटीएम अॅपबाबत तो जे सांगेल तसे करण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार टी.वेंकटेश्वर यांनी पेटीएम अॅपमध्ये आपल्या बँकेच्या खात्याची तसेच डेबिट कार्डाची सर्व माहिती भरली. (Navi Mumbai Old Person Cheated through Paytm App)

त्यानंतर भामटया शर्मा याने वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून 2 लाख 46 हजार रुपयांची रक्कम आधारशिला नावाच्या खात्यात वळती करुन घेतली. त्यामुळे टी.वेंकटेश्वर यांनी शर्मा याला संपर्क साधल्यानंतर त्याने त्याचा आयफोन आहे असे सांगितले. त्यांच्या खात्यातून डेबिट झालेली रक्कम त्यांच्या अकाऊंटवर परत येत नसल्याचे सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यानंतर भामटया शर्माने टी.वेंकटेश्वर दुसर्‍या मोबाईल फोनवरुन क्वीक स्टार आणि एसबीआय युनो हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यात त्यांना बँक खात्याची माहिती भरण्यास भाग पाडले. या भामट्याने टी.वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून तीन वेळा 1-1 लाखाची अशी 3 लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करुन घेतली. त्यानंतर या भामट्याने टी.वेंकटेश्वर यांच्या दुसर्‍या बँक खात्यातून देखील 8 हजार 500 रुपये काढून घेतले.

अशापद्धतीने या टोळीने टी.वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून तब्बल 5 लाख 54 हजाराची रक्कम काढून घेतली. यानंतर वेंकटेश्वर यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या मदतीने तळोजा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. (Navi Mumbai Old Person Cheated through Paytm App)

संबंधित बातम्या : 

नागपुरात भाडेकरु दाम्पत्याकडून घर मालकिणीचं लैंगिक शोषण, पती-पत्नीला अटक

हुशार चोरांनी 100 किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.