Bollywood Drug Case | अभिनेत्रींनंतर आता तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर

एनसीबीच्या चौकशीत आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही नावं उघड होत असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे (Big Bollywood actors in drugs case ).

Bollywood Drug Case | अभिनेत्रींनंतर आता तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 5:58 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीच्या फेरीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि रकुलप्रित सिंह (Rakul Preet Singh) यांच्यासारख्या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आल्यानंतर या चौकशीत आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही नावं उघड होत आहेत. एनसीबी लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आहे (NCB get information of big Bollywood actors in drugs case ).

एनसीबीने आपल्या तपासाचा परिघ वाढवला आहे. त्यामुळे आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही अडचण वाढणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 3 बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यामुळे अभिनेत्रीनंतर आता बडे अभिनेत्यांची चौकशीची होणार का? हाच मोठा प्रश्न आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असताना एनसीबीच्या जवळपास 15 हून अधिक अधिकाऱ्यांना कोराना संसर्ग झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे पुढील तपासासाठी बाहेरुन 2 ते 3 टीम बोलावण्यात आल्या आहेत.

एनसीबी सर्व अभिनेत्रींच्या जप्त केलेल्या फोनमधील डिलीट डाटा पुन्हा मिळवत आहे. या तपासात बॉलिवूडमधील काही मोठे अभिनेत्यांची नावं समोर येत असल्याने जप्त केलेल्या या फोनमधील डाटा महत्त्वाचा ठरणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या फोनमध्ये याबाबत महत्त्वाचे पुरावे मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एनसीबीला संशयित अभिनेत्यांविरोधात पुरावे सापडल्यास त्यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनसीबी आपल्या रडारवरील या अभिनेत्यांना केव्हा समन्स पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बॉलिवूडचे हे ए-लिस्टर अॅक्टर या अभिनेत्रींसोबत पार्टीत सहभागी झाले होते. जर या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे हाती लागले तर एनसीबी या अभिनेत्यांना देखील समन्स पाठवण्याची शक्यता आहे.

असं असलं तरी एनसीबी या अभिनेत्यांना समन्स पाठवण्याआधी त्यांच्याविरोधातील पुरावे जमा करण्यावर भर देत आहे. एनसीबीच्या प्रमुखांनी याआधीच पुरावे असल्याशिवाय एनसीबी कुणालाही समन्स पाठवणार नाही, असं म्हटलंय. आता दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या फोनमधील डाटा रिकव्हर केल्यानंतर एनसीबीला या प्रकरणात मोठे पुरावे मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतरच एनसीबी आपली पुढील कारवाई करेल.

संबंधित बातम्या :

Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

Drugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच माहिती लीक करत आहे असं सिद्ध होईल : सचिन सावंत

बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?

संबंधित व्हिडीओ :

NCB get information of big Bollywood actors in drugs case

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.