…म्हणून बिहारच्या या गावात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला ‘नो एन्ट्री’!

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या गावात पक्का रोडच झाला नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया देत आमच्या गावात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला एन्ट्री नाही, असा निर्धार बिहारमधल्या गिवहा गावातील लोकांनी केला आहे.

...म्हणून बिहारच्या या गावात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला 'नो एन्ट्री'!
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:12 AM

पाटणा : ज्या गोष्टी मोठमोठ्या भाषणांमधून मांडता येत नाहीत, त्या गोष्टी काही ओळींचे पोस्टर्स अगदी सहजपणे सांगू शकतात. काही फलक हे सर्वत्र चर्चेचा विषय ठरतात. असेच पोस्टर्स सध्या देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘या गावात नेत्यांना यायला सक्त मनाई आहे’, असा या पोस्टरवरचा मजकूर आहे. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. याच पार्श्वभुमीवर सुपौल जिल्ह्यातल्या छातापुरमधील घिवहा गावात असे पोस्टर्स पहायला मिळत आहेत. (No Entry Of Leader Out of Giwha Village In bihar)

बिहारमध्ये सध्या अनेक मुद्द्यांची चर्चा होत आहे. हे पोस्टर्सही बिहारमध्ये चर्चेचा विषय आहेत. आमच्या गावाला केवळ आश्वासनं दिली जातात मात्र विकास होत नाही. आमच्या गावाला इतर गावांशी जोडायला पक्का रस्ता नाही. ‘रस्ता नाही तर मत नाही’, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

हजाराच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या गावाला पक्का रस्ता न मिळणं, हे दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या नेतेमंडळी येतात. भाषणं देतात, आश्वासनं देतात, त्यानंतर मात्र काहीच घडत नाही. त्या नेत्यांना पुन्हा निवडणूक येते तेव्हाच आमची आठवणं येते, असं स्थानिकांचं मत आहे.

इतर सोई-सुविधा तर सोडाच पण गावात साधा रस्ता नाही, त्यामुळे गावातल्या मुलांची लग्न होत नाही. त्यांना मुली द्यायला लोक तयार होत नाहीत. त्यामुळे यंदा आम्ही मतदान न करण्याचा आणि कुठल्याही नेत्याला गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचं स्थानिक सांगतात.

बिहारमध्ये निवडणुकीत धर्म-जात या सारख्या मुद्द्यांना जास्त महत्व असल्याचं आपण पाहतो. मात्र विकासाच्या मुद्द्यावर जनता आपल्या नेत्यांना लक्ष द्यायला भाग पाडत असल्याचं चित्र आहे. घिवहा गावातल्या नागरिकांच्या भुमिकेतून हे स्पष्ट होतंय. त्यांनी घेतलेल्या भुमिकेचं परिसरात कौतुक होत आहे. या मागणीचं पुढे काय होतं, हे पाहणं महत्वपुर्ण असेल. (No Entry Of Leader Out of Giwha Village In bihar)

संबंधित बातम्या

‘मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा’; नितीशकुमारांच्या रॅलीत घोषणा

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

बिहारच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती?

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.