कोरोनाच्या रुग्णाला गोळ्या घाला, किम जोंग यांचं फर्मान?

जर आपल्या देशात कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर थेट गोळी मारा, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग (North Korea kim jong un on coronavirus) यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या रुग्णाला गोळ्या घाला, किम जोंग यांचं फर्मान?

प्योंगगँग : उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर त्याला थेट गोळी मारा, असे आदेश उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग (North Korea kim jong un on coronavirus) यांनी दिला आहे. अनेक माध्यमांनी याबाबत सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. किम जोंग नेहमी आपल्या वेगवेगळ्या आदेशांसाठी चर्चेत राहिले आहेत. त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त देखील राहिले आहेत. यंदा पुन्हा एकदा कथित वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे ते जागतिक स्तरावर चर्चेचा (North Korea kim jong un on coronavirus) विषय ठरत आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनवरुन परतलेल्या एका व्यापाऱ्याला कोरोना व्हायरस झाला आहे. हे लक्षातच येताच त्या रुग्णाला गोळी मारुन ठार करण्याचे आदेश जोंग यांनी दिले. पीडित व्यक्तीमुळे इतर कुणालाही या रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी हा आदेश जारी केला आहे, अशी माहिती मिळत आहे.

किम जोंग उन यांचा हा काही पहिलाच वादग्रस्त निर्णय नाही. यापूर्वी त्यांनी स्वत:च्या संरक्षण मंत्र्याला तोफेच्या तोंडी दिल्याचीही घटना समोर आली होती. शिवाय जनरलाला घातक माशांच्या तलावात फेकल्याचंही बोललं गेलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारा लोकांचा मृत्यू

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 86 हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे.

सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्ण हे चीनच्या हुबेई राज्यात आहेत. ज्याची राजधानी वुहानमधून गेल्या डिससेंबर महिन्यापासून हा व्हायरस पसरला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या रोगाला COVID-19 नाव दिले आहे.

चीनमध्ये या व्हायरसमुळे 2 हजार 870 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यापासून बाजारात घट झाली आहे. अनेक उद्योजकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

Published On - 10:00 am, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI