सैराट! मुलीच्या प्रियकराला ठार करुन बाप-बेटे पोलिसात हजर

सैराट! मुलीच्या प्रियकराला ठार करुन बाप-बेटे पोलिसात हजर

चंद्रपूर : पित्याने आणि भावाने मिळून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण करत ठार केले आहे. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमधील घुग्गुस येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. योगेश जाधव ( 23) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेतील आरोपींनी हत्या केल्यावर स्वत: पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल केला आहे.

चंद्रपूरमधील घुग्गुस येथे राहणारा योगेश जाधवचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबध होते. ही गोष्ट मुलीच्या घरी समजताच घरच्यांनी त्याला विरोध करत योगेशला बेदम मारहाण करत ठार केले आणि यानंतर पिता-पुत्राने स्वत: पोलिसांत जाऊन खून केल्याची कबुली दिली. प्रभुदास धुर्वे आणि भाऊ कृष्णा धुर्वे अशी आरोपींची नावं आहेत.

चंद्रपुरात 12 मे रोजी घुग्गुस येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील ट्रॅक्टर मालक प्रभुदास धुर्वे आणि मुलगा कृष्टा धुर्वे या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या गोष्टीची माहिती दिली. “माझ्या मुलीला एक मुलगा त्रास देत होता. म्हणून आम्ही त्याला मारहाण केली आहे आणि जखमी अवस्थेत त्याला निलजई खाण येथील जंगलात सोडलं आहे. तो जिवंत आहे का मृत ते माहित नाही”, असं आरोपींनी पोलिसांना सांगितलं.

योगेश 12 मे रोजी दुपारपासून घरातून बेपत्ता होता. त्याचे नातेवाईक आणि मित्र दुपारपासून त्याचा शोध घेत होते. तो बेपत्ता झाल्याची माहितीही त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. मात्र मध्य रात्री योगेशचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड आणि भंडारामध्येही आंतरजातीय आणि प्रेमविवाहातून असे हल्ले मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना देशात आणि राज्यात घडल्या आहेत. यावर आळा बसण्यासाठी अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. तसेच या हल्ल्यांचाही निषेध केला आहे.

Published On - 5:26 pm, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI