महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड

फेक अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत, अशी माहिती तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police). 

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात अकाउंट उघडण्यात आले. या अकाउंटद्वारे महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबत निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यात आली, अशी माहिती सायबर विभागाच्या तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police).

ट्विटरवर जवळपास दीड लाख बोगस अकाउंट आहेत. हे अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत, अशी माहिती तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police).

फेक अकाउंद्वारे बदनामीची मोहीम चालवली जात होती. अगदी प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री यांच्या नावाने अकाउंट उघडण्यात आले होते. याबाबत अधिक तपास केला असता अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा वापर करुन फेक अकाउंट उघडण्यात आल्याचं समोर आलं. कट करुन मुंबई पोलीस, पोलीस आयुक्त यांच्या विरोधातील मेसेज सोशल मीडिवर पसरवले जात होते.

बोट (BOT) यंत्रणेद्वारे बदनामी

ट्विटर हे जागतिक पातळीवर मोठे समाज माध्यम आहे. या समाज माध्यमावर 100 मिलियन अकाउंट आहेत. या 100 मिलियन अकाउंटद्वारे दररोज 500 मिल्लियन ट्विट केले जातात. या खात्यांचा अभ्यास केला असता, बोट (BOT) या कार्यपद्धतीचा वापर करुन राज्य सरकार, मुंबई पोलीस, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी सुरु होती.

अनेक कंपन्या, ग्रुप हे आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी बोट (BOT) या तंत्रज्ञानाचा डिजीटल मार्केटिंगसाठी वापर करतात. एकाच वेळी हजारो मेसेज पाठवण्यासाठी बोट या पद्धतीचा वापर केला जातो. राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदनामीसाठी या बोट प्रणालीचा वापर केला जात होता. ही सर्व खाती मोठ्या प्रमाणात चीन, पनामा, नेपाळ, हॉंगकॉंग या देशातून उघडण्यात आली होती.

संबंधित बातम्या : Raveena Tandon | रवीनाच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल!

Published On - 9:59 pm, Tue, 3 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI