मुंबईत कांद्याचा तुटवडा, थेट इजिप्तवरुन कांदा मागवला

आपल्याकडील कांदा उत्पादकांमध्ये तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याच्या (onion import from Egypt) निर्यातीवर बंदी घातली आहे.

मुंबईत कांद्याचा तुटवडा, थेट इजिप्तवरुन कांदा मागवला
सचिन पाटील

| Edited By:

Oct 19, 2019 | 8:42 PM

नवी मुंबई : आपल्याकडील कांदा उत्पादकांमध्ये तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याच्या (onion import from Egypt) निर्यातीवर बंदी घातली आहे. या सर्वांचा परिणाम बाजारातील व्यापारांवर होत असल्यामुळे त्यांनी थेट इजिप्तहून कांदा (onion import from Egypt) आयात केला. तो कांदा आज वाशीतील घाऊक बाजारात दाखल झाला आहे.

इजिप्तहून मागवण्यात आलेला कांदा 18 ते 20 रुपये किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र खरेदीदारांचा या काद्यांला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा कांदा बाजारात पडून आहे.

गेल्या महिन्यात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा तुटवडा बाजारात होता. त्यामुळे ग्राहक वर्गाकडूनही कांद्याच्या मागणीत वाढ झाली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी घाऊक व्यापाऱ्यांनी परदेशातून कांदा मागवला होता. त्यानुसार आता इजिप्तमधून कांद्याचे 4 कंटेनर जे एन पी टी बंदरात दाखल झाले आहेत. त्यातील एक कंटेनर आज वाशीच्या घाऊक बाजारात आला होता. त्यात 20 टन कांदा होता. भैरवनाथ ट्रेडिंग कंपनीमध्ये तो आला होता. आज या कांद्याचा दर 18 ते 20 रु किलो इतका होता. मात्र या कांद्याला बाजारात उठाव मिळाला नाही.

आपल्याकडे नवीन कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे मागच्या महिन्यात 40 ते 45 रुपये किलो झालेला कांदा आज 20 ते 25 रुपये किलो झाला आहे. पण इजिप्तवरुन आणलेला कांदा बाजारात 18 ते 20 रुपये किलोने मिळत आहे. पण त्याला ग्राहकांकडून मागणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. कारण हा कांदा दिसायला आपल्या कांद्यासारखा असला तरी तो आपल्या कांद्यासारखा भरीव नाही. तो आतमध्ये पोकळ असल्याने त्या कांद्याला आपल्या देशी कांद्याची सर नाहीय. तिखटपणा कमी असल्याने हा कांदा खरेदी करायला लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे असा कांदा हॉटेलमध्ये वापरासाठीच पाठवला जातो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें