पालघर मॉब लिचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोना, संपर्कातील 43 जण क्वारंटाईन

पालघर जिल्ह्यातील मॉब लिचिंग प्रकरणातील अटकेत असलेल्या एका आरोपीला (Palghar mob lynching accused Corona Positive) कोरोनाची लागण  झाली आहे.

पालघर मॉब लिचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोना, संपर्कातील 43 जण क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 11:35 AM

पालघर : पालघर जिल्ह्यातील मॉब लिचिंग प्रकरणातील अटकेत असलेल्या एका आरोपीला (Palghar mob lynching accused Corona Positive) कोरोनाची लागण  झाली आहे. वाडा पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या एका आरोपीचा रिपोर्ट कोरोना काल (1 मे) कोरोना पॉझिटिव्ह आला. या आरोपीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

एप्रिल महिन्यात पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद (Palghar mob lynching accused Corona Positive) उमटले होते. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनवली होती. या सर्व आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी वाडा पोलीस ठाण्यात असलेल्या एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. काल (1 मे) रात्री उशिरा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. पालघर जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी याबाबची माहिती दिली.

या आरोपीच्या संपर्कात 43 जण आले आहेत. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच इतरांचाही समावेश आहे. या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच इतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधही आरोग्य यंत्रणा घेत आहे.

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत (Palghar mob lynching accused Corona Positive) आहेत.

संबंधित बातम्या : 

पालघर हत्याकांड धार्मिक वादातून नाही, खटला CID कडे, अमित शाहांशीही चर्चा : मुख्यमंत्री

पालघर झुंडीकडून हत्या, योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन, गंभीर, पठाणसह सेलिब्रिटींकडूनही निषेध

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.