Video : काल पवार म्हणाले, पंकजा मुंडे एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, आता दिल्लीला जाता जाता पंकजांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असं म्हटलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे यांनी ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Video : काल पवार म्हणाले, पंकजा मुंडे एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, आता दिल्लीला जाता जाता पंकजांचं उत्तर
पंकजा मुंडे, शरद पवार


मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीवारीवर जात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असं म्हटलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे यांनी ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. (Pankaja Munde’s reaction to Sharad Pawar’s statement about Leadership)

मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. त्यांचं बरोबर आहे, मी एवढी मोठी नेता नाही. मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे, असं मी शिकली आहे. ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशीच आहे. बाकी ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्यात काही वादच नाही’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी भाजप सांगतं की महाविकास आघाडी सरकार पडेल. पण पंकजा मुंडे यांनी हे राजकारण बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षमपणे राबवावी असं भाष्य केलं. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’.

सरकार पाडण्यावरुन पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

सावरगावच्या भूमीतून दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी भाजप नेत्यांना दिला.

इतर बातम्या :

‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल, कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार, नवाब मलिकांची आक्रमक भूमिका

Pankaja Munde’s reaction to Sharad Pawar’s statement about Leadership

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI