AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लडाख-सियाचीनमध्ये जवानांना थंडीच्या कपड्यांच्या कमतरतेची तक्रार, संसदीय समिती लडाख दौऱ्यावर जाणार

कॅगच्या अहवालात भारतीय सैनिकांना लडाख सियाचीनमध्ये थंडीच्या कपड्यांची कमतरता असल्याचं निरीक्षण नोंदवल्यानंतर आता भारताची संसदीय समिती 2 दिवसांच्या लेह-लडाख दौऱ्यावर जात आहे.

लडाख-सियाचीनमध्ये जवानांना थंडीच्या कपड्यांच्या कमतरतेची तक्रार, संसदीय समिती लडाख दौऱ्यावर जाणार
| Updated on: Oct 13, 2020 | 4:36 PM
Share

नवी दिल्ली : चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची संसदीय समिती 2 दिवसांच्या लेह-लडाख दौऱ्यावर जात आहे (Parliamentary Committee Ladkah Visit). या समितीतील खासदार भारताच्या मुख्य चौक्यांची पाहणी करणार आहेत. यावेळी सैन्याच्या जवानांच्या कामाची पद्धत आणि तेथील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, मध्यंतरी कॅगच्या एका अहवालात लडाख आणि सियाचीन भागात जवानांसोबतच थंडीच्या कपड्यांचीही कमतरता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याचा विचार करुन संसदीय समितीचा हा दौरा होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या सभापतींनी संसदीय समितीच्या भेटीला परवानगी दिली आहे. त्यानुसार ही संसदीय समिती 2 दिवसाच्या लेह-लडाख दौऱ्यावर जात आहे. 28-29 ऑक्टोबर असे दोन दिवस पब्लिक अकाऊंट कमेटीचे सदस्य लेहमध्ये असतील. या काळात संसदीय समितीचे सदस्य खासदार भारताच्या मुख्य चौक्यांना भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेणार आहेत.

जवानांकडे थंडीच्या कपड्यांची कमतरता असल्याचा कॅग अहवाल

कॅगच्या एका अहवालात लडाख आणि सियाचीन भागात भारतीय जवानांकडे थंडीच्या कपड्यांची कमतरता असल्याचं निरिक्षण नोंदवलं होतं. पब्लिक अकाऊंट कमेटीचे सदस्य या अहवालाचाही अभ्यास करणार आहेत. यात हाय अल्टीट्यूड (अतिउंच भाग) भागात काम करणाऱ्या सैनिकांकडे थंडीचे कपडे, स्नो गॉगल्स यांची कमतरता असल्याचं म्हटलं होतं.

संसदीय समितीचे सदस्य लेहमध्ये संरक्षण दलाचे अधिकारी आणि सैन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबतही चर्चा करणार आहे. यात हाय अल्टीट्यूट क्लॉथ, इक्विपमेंट, अन्न आणि वस्तूंचा पुरवठा आणि राहण्याची व्यवस्था इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.

दरम्यान, लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ राहिलेला तणाव अद्यापही कायम आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक स्तरीय चर्चा झाल्या मात्र त्यानंतरही तणाव कायम आहे. चीनकडून आडमुखी भूमिका घेतली जात आहे. नुकतेच पेंगोंग तलावाच्या बाजूला चीनकडून काही जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय सैनिकांनी हा डाव हाणून पाडला होता.

संबंधित बातम्या :

सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला

सीमेवरील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही, मॉस्कोतील बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट इशारा

India China Conflict | चीनचा दुतोंडीपणा, पँगाँग, शिनजियांग भागात चिनी सैन्य तैनात

Parliamentary Committee going to visit Leh Ladkah after CAG report

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.