AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोलच्या किंमती रडवणार! देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल आज नांदेडमध्ये; वाचा ताजे दर

नांदेड : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात महागडं पेट्रोल हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात विकलं जात आहे. मजल दर मजल करत अखेर आज या पेट्रोलने सेंच्युरी […]

पेट्रोलच्या किंमती रडवणार! देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल आज नांदेडमध्ये; वाचा ताजे दर
| Edited By: | Updated on: Feb 19, 2021 | 10:55 AM
Share

नांदेड : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात महागडं पेट्रोल हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात विकलं जात आहे. मजल दर मजल करत अखेर आज या पेट्रोलने सेंच्युरी गाठली आहे. (Petrol prices hike today most expensive petrol in the country today in Nanded Read the latest rates)

धर्माबादमध्ये महाग पेट्रोल का?

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी आज 100 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 89.63 प्रति लिटर द्यावे लागत आहेत. धर्माबादला सोलापूरच्या ऑइल डेपोतून इंधन पुरवठा होतो, हे अंतर अधिकचे असल्याने इथे इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. मात्र शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात प्रति लिटर पाच रुपयाने इंधन स्वस्त आहे.

तीन अंकी डिस्प्लेच नाही

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर झाला आहे. कारण पेट्रोलच्या मशीनमध्ये 3 अंकी डिस्पेलच नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ऐन सुट्टीच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इतर शहरांमध्ये इंधनाचे काय आहेत दर?

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग 11 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 31 पैसे वाढीसह 90.19 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.62 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. शुक्रवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी कोलकातामध्ये पेट्रोल 91.41 लिटर भाव आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर आज दिल्लीत डिझेल 80.60 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 87.62 तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 84.19 रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.19 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 96.62 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.41 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Petrol Price Today) : 96.25 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.25 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.62 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.60 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.67 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.19 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Diesel Price Today) : 85.98 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.31 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 80.70 रुपये प्रति लिटर (Petrol prices hike today most expensive petrol in the country today in Nanded Read the latest rates)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price : आज मुंबईसह या शहरांमध्ये पुन्हा वाढले पेट्रोलचे भाव, वाचा आजचे दर

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

(Petrol prices hike today most expensive petrol in the country today in Nanded Read the latest rates)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.