मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

सर्वात आधी कोरोना लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस 95 टक्के परिणामकारक असल्याचं वैद्यकीय चाचणींच्या निकालतून समोर आलंय.

मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता
'आपल्या सगळ्यांना लसीची आवश्यकता आहे आणि या वर्षाच्या अखेरीस आपल्याकडे कोरोनावर मात करण्यासाठी लस असेल अशी आम्हाला आशा आहे' असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 8:00 PM

वॉशिंग्टन : कोरोना लसीबाबत मोठी बातमी आहे. सर्वात आधी कोरोना लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस 95 टक्के परिणामकारक असल्याचं वैद्यकीय चाचणींच्या निकालतून समोर आलंय. फायझरची ही लस दिल्यानंतर 28 दिवसांनी हे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेत. या चाचणीत कोरोना संसर्ग झालेल्या 170 रुग्णांचाही समावेश असल्याचा दावा फायझरने केला आहे (Pfizer and BioNTech say coronavirus vaccine is 95 percent effective).

फायझर कंपनीने जर्मनीची कंपनी बायोएनटेकसोबत मिळून ही लस विकसित केली आहे. यानंतर आता ही लस अमेरिकेच्या औषध नियंत्रण संस्था FDA आणि EUA कडे तपासणीसाठी जाणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूरीसाठी ही लस जगभरातील इतर देशांच्या औषध नियंत्रण संस्थांकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहे.

फायझरने कंपनी 2020 या वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास 50 मिलियन डोस तयार करेल, असा दावा कंपनीने केलाय. तसेच 2021 च्या अखेरपर्यंत फायझर 130 कोटी डोस उपलब्ध करेल, असंही सांगण्यात आलं. जगभरात कंपनीच्या पायाभूत सुविधा आणि कोल्ड चेनचा उपयोग करुन फायझर विविध देशांमध्ये सहजपणे कोरोना लस उपलब्ध करेल, असाही दावा कंपनीने केलाय.

फायझर आणि बायोएनटेकने आपल्या कोविड-19 लसीच्या तपासणीसाठी यावर्षी जुलैमध्ये लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायल सुरु केल्या होत्या. या चाचणीत 43 हजार 661 लोकांना फायझरच्या कोरोना लसीचा डोस देण्यात आला. यानंतर दुसरा डोस 41 हजार 135 लोकांना देण्यात आला. हा डोस 13 नोव्हेंबरला देण्यात आला. या चाचणीत 30 टक्के अमेरिकन नागरिकांचा समावेश करण्यात आला होता.

डोस देण्यात आलेल्यांपैकी 45 टक्के नागरिकांचं वय 56-85 वर्षांच्या दरम्यान होतं. अमेरिका, जर्मनी, तुर्की, दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि युगांडामध्ये 150 वैद्यकीय चाचण्या झाल्या होत्या. फायझरने म्हटलं, “नोव्हेंबरच्या तिसऱ्या हप्त्यात कंपनी तातडीच्या मंजूरीसाठी अमेरिकेसह सर्व नियंत्रक संस्थांकडे जाईल. त्यानंतर तज्ज्ञांच्या बाह्य सल्लागार समितीचा सल्लाही घेईल.”

कोरोना लसीच्या यशस्वी चाचणीनंतर BioNTech कंपनीचे प्रमुख (CEO आणि MD) उगर सहिन म्हणाले, “पहिल्या 30 एमजी डोसच्या निकालाने आम्ही खूप समाधानी आहोत. सुरुवातीपासून आमचं लक्ष्य कोरोनाशी प्रभावीपणे सामना करु शकेल अशी चाचणी तयार करण्याचं ध्येय होतं. या लसीच्या निर्मितीत सहभागी असणारे संशोधक आणि निर्मितीत योगदान असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही आभार मानतो.”

संबंधित बातम्या :

केवळ लसीच्या बळावर कोरोनावर मात करणं शक्य नाही!, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

रशिया आणि उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हल्ला, भारतातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लक्ष्य

संबंधित व्हिडीओ :

Pfizer and BioNTech say coronavirus vaccine is 95 percent effective

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.