भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या व्हिलचेअरचा लिलाव होणार

भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या व्हिलचेअरचा लिलाव होणार

लंडन : विश्वनिर्मितीचं गूढ शोधणाऱ्या जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांची चाकांची खुर्ची (व्हिलचेअर), पदकं आणि त्यांचं हस्ताक्षऱ असलेली पीएचडी थिसिस यांसह इतर अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील क्रिस्टीकडून या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार असून, या वस्तूंभोवती जगभरात एक अनोखी कुहुतहलता आहे. कारण ज्या व्हिलचेअरवर बसून स्टीफन हॉकिंग यांनी विश्वनिर्मितीचं गूढ शोधण्याचा अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न केला, त्याच व्हिलचेअरचा लिलाव करण्यात येणार आहे.

स्टीफन हॉकिंग यांनी बीईसी मोबिलिटी व्हिलचेअरचा वापर 1980 ते 1990 या काळात केला होता. व्हिलचेअरची 15 हजार पाऊंडमध्ये विक्री होऊ शकते. 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या एकूण 22 वस्तूंची विक्री होणार आहे. विश्वाच्या उत्पत्तीवरील डॉक्टरल थिसिस, काही पुरस्कार, संशोधनपत्र इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे. स्पेक्ट्रम ऑफ वार्महोल्स आणि फंडामेंटल ब्रेकडाऊन ऑफ फिजिक्स इन ग्रेव्हिटेशनल कॉलेप्स या संशोधन पत्रकांचाही या लिलिवात समावेश असेल.   

वयाच्या 21 व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्युरॉन नावाचा आजार झाला. या आजारातून त्यांच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. मात्र अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी वयाची 76 वर्षे ओलांडली. या आयुष्यात त्यांनी विश्वनिर्मितीच्या शोधाचा ध्यास घेतला. विज्ञान क्षेत्रात अफाट कामगिरी केली. अवघ्या जगाला कुतुहल वाटणारं आणि थक्क करणारं संशोधन त्यांनी व्हिलचेअरवर बसून केलं.

स्टीफन हॉकिंग यांचा अल्पपरिचय

8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायरमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी म्हणजे 1963 साली स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्युरॉन या आजाराने ग्रासलं. यापुढे हॉकिंग केवळ दोनच वर्षे जगू शकतं, असे डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, व्हिलचेअरवर खिळलेल्या अवस्थेत राहूनही तब्बल 55 वर्षे संशोधनात्मक कार्य केलं.  

आगामी 100 वर्षात मानवाला पृथ्वी सोडावी लागेल आणि नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल, असं भाकित स्टीफन हॉकिंग यांनी 2017 सालीच वर्तवला होतं.

बिग बँग थिअरीकृष्णविवर यासंदर्भातील स्टीफन हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरीसापेक्षतावाद आणि कृष्णविवरावरील त्यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI