पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पिंपरी चिंचवड शहरातील 132, तर उपचारासाठी दाखल असलेल्या शहराबाहेरील 10 अशा एकूण 142 रुग्णांना आतापर्यंत 'कोरोना'ची लागण झाली आहे (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

पिंपरी चिंचवडला 'कोरोना'चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 8:33 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रास्तांचा आकडा 142 वर गेला आहे. यमुनानगर, तळवडे, चिखली हा परिसर असलेल्या ‘फ’ प्रभागात सध्या सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडले आहेत. (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

पिंपरी चिंचवड शहरातील 132, तर उपचारासाठी दाखल असलेल्या शहराबाहेरील 10 अशा एकूण 142 रुग्णांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शहरातील तीन, तर शहराबाहेरील 2 अशा पाच रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्याची नोंद आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयातून 55, तर शहराबाहेरील रुग्णालयातून 2 असे एकूण 57 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 76 इतकी आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काल दुपारपर्यंत (5 मे) ‘कोरोना’चे 9 नवे रुग्ण आढळले होते. सकाळी तीन, तर दुपारी 6 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यात दोन लहान मुलांचाही समावेश होता. यातील तीन रुग्ण हे रुपीनगर भागातील आहेत. पिंपरी चिंचवड शहरात रुपीनगर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. आतापर्यंत या भागात सर्वाधिक 35 रुग्ण आढळले आहेत.

प्रभागनिहाय पाहता ‘फ’ प्रभागात सध्या सर्वाधिक म्हणजे 34 अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. काळेवाडी, चिंचवड, रावेत हा परिसर असलेल्या ‘ब’ प्रभागात सध्या एकही रुग्ण नाही.

5 मेपर्यंत असलेल्या अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह 76 रुग्णांची प्रभागनिहाय आकडेवारी

प्रभाग अ – निगडी, प्राधिकरण, आकुर्डी – 05

प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत – 00

प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी – 04

(Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – 11

प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 09

प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 34

प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 05

प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी – 08

संबंधित बातम्या : 

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?

(Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.