पुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार

पुणे शहर 'स्लम फ्री सिटी' होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार

पुणे महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवा प्रयोग राबविणार आहे (PMC working for slum free city).

चेतन पाटील

|

May 30, 2020 | 10:51 AM

पुणे : पुणे महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवा प्रयोग राबविणार आहे (PMC working for slum free city). महापालिकेने आता पुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ करण्याचा निश्चय केला आहे. महापालिका शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या शून्यावर आणून त्याजागी टुमदार घरं बांधणार आहे. या योजनेत स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य असणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली (PMC working for slum free city).

पुणे शहरात सध्या 568 झोपड्या आहेत. शहर जर झोपडपट्टीमुक्त झाले तर भविष्यात कोरोनासारख्या साथीला रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेकडून ही उपाययोजान केली जात आहे.

पुण्यात पुन्हा कुणी झोपडपट्ट्या उभारु नये यासाठी झोपडपट्ट्या प्रतिबंधित कायदा आणणार, असं आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं आहे. याशिवाय झोपडपट्ट्या पाडून त्याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या टुमदार घरांच्या बांधकामासाठी उच्च तंत्रज्ञान वापरलं जाईल, अशी माहितीदेखील आयुक्तांनी दिली.

पुणे महापालिका वर्षाला 75 हजार ते 1 लाख चौरस फूट बांधकाम करणार आहे. यासाठी मोकळ्या जागांचा शोध घेणे, त्यावरील अतिक्रमण, झोपडपट्ट्यांची संख्या आणि तेथील घरांची पाहणी करुन कार्यवाही केली जाणार आहे. या कामासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे, असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, आयुक्तांचा दावा

झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा किंवा इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शहरात आता चांगल्या नागरि व्यवस्थेची उपययोजना केली जात आहे. दरम्यान, पुण्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असताना महापालिका आयुक्तांनी पुण्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

पुण्याचा मृत्यूदर 14 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आला आहे. तसेच पुढील 15 दिवसांनी हा दर साडेचार टक्के आणि त्यानंतर तो राज्याच्या बरोबरीने येईल, असा दावा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना संकटात पुणेकरांची महापालिकेला आर्थिक साथ, तब्बल 280 कोटींचा कर ऑनलाईन भरला

पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार

रायगडमध्ये 556 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा हजाराच्या पार

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें