Sushant Case LIVE | ‘सुशांतला ड्रग्ज का आणि कुणाच्या सांगण्यावरुन दिले?’ सीबीआयकडून रियावर प्रश्नांची सरबत्ती

सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे (Police protection to Rhea Chakraborty).

Sushant Case LIVE | 'सुशांतला ड्रग्ज का आणि कुणाच्या सांगण्यावरुन दिले?' सीबीआयकडून रियावर प्रश्नांची सरबत्ती
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 5:38 PM

मुंबई : सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे (Police protection to Rhea Chakraborty). सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या  पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून रियाच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होत आहे. रियाने याबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर सीबीआयने रियाचं घर ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या प्रवासासाठी रियाला सुरक्षा देण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती. दरम्यान, रियाची शुक्रवारी (28 ऑगस्ट) 10 तास सीबीआय चौकशी झाली. आज पुन्हा तिची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सिद्धार्थ पिठानीची बीकेसी ऑफिसला 12 तास चौकशी झाली.

LIVE Updates:

  • सीबीआयचा दिशा सालियनच्या मृत्यूबद्दल रियाला प्रश्न, पण दिशा सालियन आणि तिच्या मृत्यूबद्दल आपल्याला माहिती नसल्यास रियाचं उत्तर, सुशांतचा तणाव, दिशा सालियान आणि रियाचे परदेश दौरे आजच्या सीबीआयचा तपासाचे मुद्दे, सीबीआयने रियाला तिच्या परदेशी दौऱ्याचे कागदपत्रे मागितले
  • रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु, रिया सोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, माजी मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांचीदेखील चौकशी, पण रिया, शौविक, सॅम्युअल मिरांडा यांची वेगवेगळी चौकशी, ड्रग्ज आणि पैश्यांच्या मुद्यांवर चौकशी, आजच्या चौकशीचे हेच मुद्दे, ड्रग्ज का आणि कोणाच्या सांगण्यावरुन दिले? सिबीआयकडून सतत विचारणा, रियाकडून समर्पक उत्तर नाही, ड्रग्ज पुरवठादाराबाबतही विचारणा
  • सुशांत सिंग राजपूतचा सीए डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल, संदीप श्रीधर यांचीही सीबीआय चौकशी होणार
  • रियाची सलग दुसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी, पोलीस बंदोबस्तात डीआरडीओ कार्यालयात दाखल

सीबीआय सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलने रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. रियाने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत विमानाची भीती वाटत असल्याने विमानात बसण्याआधी मोडाफीन औषध घ्यायचा असं म्हटलं होतं. तिने स्वतः ड्रग्जचं सेवन कधीच केलं नाही, असंही तिने सांगितलं होतं. रिया सुशांतसोबत एप्रिल 2019 ते 8 जून 2020 या कालावधीत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र ज्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप झालाय त्यांच्यासोबत ती 2017 पासून संपर्कात असल्याचं समोर आलंय. रियाच्या चॅटमुळे ड्रग्जचा संशय बळावल्याचं बोललं जात आहे.

View this post on Instagram

This is inside my building compound , The man in this video is my father Indrajit chakraborty ( retd . army officer ) We have been trying to get out of our house to cooperate with ED , CBI and various investigation authorities to cooperate . There is a threat to my life and my family’s life . We have informed the local police station and even gone there , no help provided . We have informed the investigation authorities to help us get to them , no help arrived . How is this family going to live ? We are only asking for assistance , to cooperate with the various agencies that have asked us . I request @mumbaipolice to please provide protection so that we can cooperate with these investigation agencies . #safetyformyfamily In covid times , these basic law and order restrictions need to be provided . Thankyou

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

दरम्यान, सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी सुरु असतानाच तिच्या घराबाहेर माध्यमांचा मोठा गराडा पडला आहे. याआधी एकदा तेथे गर्दीमुळे गोंधळही उडाला होता. रियाने याचा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी काळजीही व्यक्त केली होती. त्याचपार्श्वभूमीवर सीबीआयने रियाला तिच्या घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली.

यानंतर मुंबई पोलीस रियाला देणार सुरक्षा आहे. सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया आणि तिच्या कुटुंबाला घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत सांताक्रुझ पोलीस सुरक्षा देणार आहेत. सांताक्रूझच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. अद्याप मुंबई पोलीस रियाच्या घरी पोहोचलेले नाहीत. पोलीस येताच रिया सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओला निघणार आहे.

अर्णव गोस्वामी आणि भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा : अनिल गोटे

दरम्यान, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सुशांत सिंह प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी अर्णव गोस्वामी आणि अन्य भाजप नेत्यांच्या विरुध्द सुशांत प्रकरणात पुरावे लपवुन ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अर्णव गोस्वामी आणि भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?

Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा – रिया चक्रवर्ती

CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?

Police protection to Rhea Chakraborty

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.