अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण; वरिष्ठांच्या अहवालानंतर पोलीस अधिकारी सुरेश वराडेंवर कारवाई?

अन्वय नाईक (Anvay Naik case) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे निलंबन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण; वरिष्ठांच्या अहवालानंतर पोलीस अधिकारी सुरेश वराडेंवर कारवाई?
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 12:35 AM

मुंबई : अन्वय नाईक (Anvay Naik case) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे निलंबन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर वराडे यांच्यावर ही कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्याकडे होती. त्यावेळी चौकशीअंती कोणतेही पुरावे मिळाले नाही म्हणून न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर याच तपासाची चौकशी वरीष्‍ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत आहे. या तपासणी चौकशी अहवालात सुरेश वराडे यांच्यावर तपासात गंभीर त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

संबंधित बातम्या :

सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही कारवाई का नाही? : नाईक कुटुंब

अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.