Diwali 2021: मोदींनी सैनिकांसोबत साजरा केला दिपोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी यावर्षी देखील आपली दिवाळी जवानांसोबत साजरी केली. मोदींनी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौरीमधील नौशेरा सेक्‍टरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत दिपोत्सव साजरा केला.

Diwali 2021: मोदींनी सैनिकांसोबत साजरा केला दिपोत्सव

श्रीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी यावर्षी देखील आपली दिवाळी जवानांसोबत साजरी केली. मोदींनी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौरीमधील नौशेरा सेक्‍टरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत दिपोत्सव साजरा केला. यानंतर पंतप्रधान जम्मू काश्मीर आणि लडाखच्या बॉर्डरचा देखील दौरा करणार आहेत. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. चांगल्याचा वाईटावर झालेल्या विजयाचे प्रतिक म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र देशात अद्यापही कोरोना संकट कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन आणि वायू प्रदुषणविरहीत दिवाळी साजरी करावी असे आवाहन देखील यावेळी मोदींनी केले आहे.

असा आहे पंतप्रधानांचा दौरा

पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नौशेरामध्ये पोहोचले असून, त्यांनी याठीकाणी असलेल्या ब्रिगेड मुख्यालयात जवानांसोबत चहा आणि जेवनाचा अस्वाद घेतला, त्यानंतर जवानांच्या वतीने त्यांना सैनिकांच्या तयारी विषयी माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर सैनिकांना संबोधित केले.  मोदींनी 2019 साली एलओसीवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 

कडेकोट बंदोबस्त 

पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजौरी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या घटना घडल्या आहेत. जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली असून, पंतप्रधानांच्या भेटीमुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असल्याचे सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सैनिकांनी दहशतवाद विरोधी मोहीम सुरू केली आहे, याचाच परिणाम म्हणून  नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सैनिकांमधील चकमकीच्या घटना वाढल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार महिन्यात तब्बल 14 सैनिक या चकमकीमध्ये शहीद झाले आहेत.

संबंधित बातम्या 

Ladakh travel : लडाख बनले तरुणांचे पर्यटनासाठी सर्वात आवडते ठिकाण, ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI