PHOTO : देशभरात रंगपंचमीचा उत्साह, बॉलिवूड कलाकारांकडून रंगांची उधळण
देशभरात मोठ्या धुमधडाक्यात (Bollywood Holi celebrations) होळीचा सण साजरा केला जातो.

- देशभरात मोठ्या धुमधडाक्यात (Bollywood Holi celebrations) होळीचा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमी खेळण्यात सेलिब्रेटी कुठेही कमी नाहीत. बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटीनेही उत्साहात रंगपंचमी साजरी केली.
- प्रियांका चोप्राने पती निक जोनससोबत रंगपंचमीचा आनंद लुटला. याबाबतचा एक फोटोही शेअर केला. त्यासोबतच कार्तिक आर्यन, सोनाक्षी सिन्हा, अमिताभ बच्चन यासारख्या बॉलिवूड कलाकारांनी धुळवडीचे फोटो शेअर केले आहेत.
- अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रंगांची उधळण करताना एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनी मुलगी इनायासोबत होळीचा आनंद लुटला. याबाबतचा एक छान फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
- बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी केली. जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, आराध्या बच्चन यांचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
- हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविक यांनीसुद्धा प्रेमाच्या रंगांची उधळण केली आहे. हार्दिकच्या कुटुंबीयांसोबत नताशाने होळी साजरी केली आहे.






