दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दिड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या
dhule suicide
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:14 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दिड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान शनिवारी (9 जानेवारी) दिल्ली-हरियाणा सिंघू सीमेवर पंजाबमधील 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. मृत शेतकरी अमरिंदर सिंह हे मूळचे पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील रहिवासी होते. शनिवारी रात्री त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Protesting Farmer Amarinder Singh Dies By Suicide At Singhu Border)

ज्या ठिकाणी त्यांनी विष प्राशन केलं होतं तिथे सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याने सांगितले की, अमरिंदर सिंह यांनी संध्याकाळी स्टेजच्या मागे जाऊन विष घेतलं. त्यानंतर ते स्टेजच्या पुढच्या बाजूला उभ्या केलेल्या मंडपात आले होते. त्याचवेळी ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर शेतकऱ्यांनी सिंह यांना रुग्णालयात नेले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अमरिंदर सिंह यांनी आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या किंवा ज्यांनी सिंह यांना रुग्णालयात नेलं त्या शेतकऱ्यांना सिंह यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोटदेखील मिळालेली नाही. गेल्या 45 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या अनेक बैठकींमधून कोणतेही ठोस निर्णय झालेले नाहीत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले की, “शेतकरी गेल्या 45 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोनल करत आहेत. आम्ही सरकारसमोर शांततेच्या मार्गानेच आमच्या मागण्या मांडणार आहोत. आमचा पूर्वी जो अजेंडा होता, तोच आताही आहे. तिन्ही कायदे रद्द केले जावेत, MSP बाबत कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोग लागू केला जावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत”,

कृषी कायदे रद्द होणार नाहीच; केंद्र सरकार भूमिकेवर ठाम

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान शुक्रवारी (8 जानेवारी) झालेली आठवी बैठकही निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.

येत्या 15 जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये नववी बैठक होणार आहे. त्यात तोडगा काढण्यात आम्ही यशस्वी होऊ, असं कृषीमंत्री म्हणाले. 15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. बाबा लख्खा सिंह हे शीख समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यांच्याशीही मी चर्चा केली आहे. शेतकरी संघटनांसोबत चर्चा करताना आलेल्या अडचणी लख्खा सिंह यांना सांगितल्याचं तोमर म्हणाले. शेतकरी नेत्यांशी तुम्ही स्वत: चर्चा करा. शेतकरी नेत्यांकडे कायदे रद्द करण्याशिवाय दुसरा काही पर्याय असेल तर आम्ही चर्चा करू, असंही लख्खा सिंह यांना सांगितल्याचं तोमर यांनी स्पष्ट केलं.

2024 पर्यंत आंदोलन करू

सरकारसोबतची चर्चेची आठवी फेरीही निष्फळ झाल्याने शेतकरी संघटनांचे नेते संतापले आहेत. सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. बैठकीत सर्वच नेत्यांनी एका सूरात कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. कायदा रद्द करावा ही आमची मागणी आहे. तर, कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्हीही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आता 2024 उजाडलं तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. 2024 पर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असं भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

शेतकरी आंदोलन पेटलं! दिल्लीत संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या

‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले

(Protesting Farmer Amarinder Singh Dies By Suicide At Singhu Border)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.