पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक टेस्ट, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 3 जम्बो रुग्णालयं उभारणार : नवल किशोर राम

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, देशात सर्वाधिक टेस्ट या पुणे जिल्ह्यात होत आहे.

पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक टेस्ट, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 3 जम्बो रुग्णालयं उभारणार : नवल किशोर राम
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 8:58 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (Highest COVID-19 Tests Done In Pune). मात्र, देशात सर्वाधिक टेस्ट या पुणे जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यात सरासरी 12 ते 14 हजार टेस्ट होत आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने बेडशीट समस्या जाणवत आहे. मात्र, पुणे शहरात जिल्ह्याबाहेरचे 25% पेशंट आहे. येत्या काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तीन जंबो रुग्णालयं उभारण्यात येणार आहेत. यामुळे साधारण 3000 बेडची व्यवस्था होणार आहे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती दिली (Highest COVID-19 Tests Done In Pune).

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. काही दिवस नकारात्मक चित्र दिसेल. वाढणाऱ्या रुग्णसंख्यामुळे आज जरी खराब दिसत असलं तरी आम्ही 100% तोडगा काढून जिल्हा कोरोना मुक्त करणार, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

त्याचबरोबर वीकेंडला दोन दिवस मार्केटला गर्दी टाळण्यासाठी बंद बाबत आम्ही सकारात्मक आहोत. या वीकेंडच्या आत आमचा पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकतो. आमची लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. लोकांना त्रास देण्याची इच्छा नाही. पण, शनिवार-रविवार बंद संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महिला रुग्णांच्या सुरक्षेसंदर्भात सर्व वैद्यकीय कर्मचारी नर्सेस महिला असतात. त्याचबरोबर सीसीटीव्हीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांचे तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं (Highest COVID-19 Tests Done In Pune).

पुण्यात कोरोनाचे 71, 500 रुग्ण

पुण्यात सध्या कोरोनाचे 71, 500 रुग्ण आहेत. आज पुण्यात 2 हजार 814 नवीन रुग्ण आढळून आले. तर 2 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 44 हजार डिस्चार्ज तर 25 हजार 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 24 तासात 35 मृत्यू असून आतापर्यंत 1 हजार 705 मृत्यू झाला आहे. डाटा अपडेट झाल्यावर कोणताही फरक दिसणार नाही. लॉकडाऊन काळात 12 हजार 411 रोज सँपल घेतले आहेत. 2.74 वरुन मृत्यू दर 2.38 घसरला आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहेत. तीन जंबो फॅसिलिटी उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड असणार आहेत. बुधवारी-गुरुवारी वर्क ऑर्डर त्यानंतर 15 दिवसांनी ऊभे होईल. पिंपरी चिंचवड, पुणे सर्व रुग्णांना उपलब्ध होईल. ऑक्सिजन मुबलक उपलब्ध आहे. पुढील महिनाभर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहे. 18 कोटी कोव्हिड निधी आला असून सर्व जिल्ह्यांना वाटप केले, प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे.

बेड उपलब्ध करण्यावर भर आहे. नोंदणी नर्सिंगहोम यांना पण कोव्हिड नेटवर्कमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. पाहिलं जेम्बो सीओईपी इथे असेल. सनस मैंदन, बालेवाडी इथं पर्याय उपलब्ध असून पाहणी करुन निर्णय घेणार आहे. आयसीएमआर निर्देश नुसार टेस्टिंग होत आहेत. कमकुवत रुग्णांना भर दिला आहे. यामुळे पुढील आवाहन तोंड देण्यात यश येईल, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.

अपडेट माहिती आणि निष्काळजीपणा करणाऱ्यापूर्वी 25 रुग्णांलय कारवाई होणार आहे. तर परवा 10 हॉस्पिटल नोटीस दिली आहे. त्याचबरोबर नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.

Highest COVID-19 Tests Done In Pune

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.