Pune Lockdown : पुण्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक

पुणे जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Pune Lockdown : पुण्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक

पुणे : पुणे जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची (Pune Lockdown Update) वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. परराज्यात, इतर जिल्ह्यात अडकलेले नागरिक आता एसटी आणि रेल्वे सुरु झाल्याने पुण्यात परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून हा निर्णय (Pune Lockdown Update) घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन मुळे परराज्यात, जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, इतर नागरिक पुणे जिल्ह्यात परतत आहेत. हे नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी, ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला (Pune Lockdown Update) आहे.

त्यामुळे प्रवास करुन आलेल्या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या, गावांच्या सीमेवरच वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असेल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची आता वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असेल.

पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 3,365 वर 

पुणे जिल्ह्याबरोबरच पुणे विभागातही सातत्याने कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर विभागात आतापर्यंत175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 953 असून 115 रुग्ण गंभीर रुग्ण आहेत. तर विभागातील 1 हजार 237  कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ही (Pune Lockdown Update) माहिती दिली.

संबंधित बातम्या :

दारुची दुकानं सुरु केली, मग मंदिरही खुली करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्याच्या विषाणू संस्थेचे मोठे संशोधन, अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 125 नवे कोरोनाबाधित, आठ रुग्णांचा बळी

पुण्यात हडपसरमध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू, तर कंटेनमेंट झोनमधील झोपडपट्ट्यांमध्ये 6 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

Published On - 8:41 pm, Mon, 11 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI