पुण्याच्या विषाणू संस्थेचे मोठे संशोधन, अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित

देशात विकसित केलेल्या या टेस्टिंग किटला 'कोविड कवच एलिसा टेस्ट' असे नाव देण्यात (Pune NIV antibody test kit India) आले आहे.

पुण्याच्या विषाणू संस्थेचे मोठे संशोधन, अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित

पुणे : कोरोना विषाणूच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण यश मिळवले (Pune NIV antibody test kit India) आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अँटीबॉडीज तपासण्याचे किट विकसित केले आहे. त्यामुळे प्रथमच भारतात स्वदेशी अँटीबॉडी टेस्ट किटचे संशोधन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली. देशात विकसित केलेल्या या टेस्टिंग किटला ‘कोविड कवच एलिसा टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

या किटमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोनाच्या प्रादुर्भावावर (Pune NIV antibody test kit India) लक्ष  ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणीच याची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी ही किट योग्य असल्याचे निदर्शनास आले.

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मोठे संशोधन करत अँटीबॉडी तपासण्याचे किट यशस्वीरित्या विकसित केले आहे. हे किट कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का हे तपासण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे. येत्या काळात जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना विषाणू संसर्गावर लक्ष ठेवण्यात तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची ओळख पटवण्यात ही किट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या किटद्वारे एखाद्याच्या रक्तात किती रोगप्रतिकारक शक्ती आहे याची माहिती मिळणार आहे.

मुंबई दोन ठिकाणी या किटच्या टेस्टची परवानगी देण्यात आली होती. त्याचे परिणाम अतिशय उत्तम आलेत. एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही किट तयार केली आहे. DCGI ने याचे प्रोडक्शन करण्यास zydus cadila या कंपनीला परवानगी दिली (Pune NIV antibody test kit India) आहे.

संबंधित बातम्या : 

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 125 नवे कोरोनाबाधित, आठ रुग्णांचा बळी

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *