AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान

पुण्यात एक आगळवेगळं लग्न पार पडलं आहे. या लग्नात वर आणि वधूचे वडील पोहोचू न शकल्याने चक्क पुणे पोलिसांनी मुलीचे कन्यादान केले आहे.

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान
| Updated on: May 02, 2020 | 11:31 PM
Share

पुणे : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे ऐन (Pune Police Perform Kanyadan) लगीनसराईच्या काळात सर्व लग्नसमारंभ खोळंबळी आहेत. त्यातच पुण्यात एक आगळवेगळं लग्न पार पडलं आहे. या लग्नात वर आणि वधूचे वडील पोहोचू न शकल्याने चक्क पुणे पोलिसांनी मुलीचे कन्यादान (Pune Police Perform Kanyadan) केले आहे.

पुण्यात सध्या कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील सर्वाधिका कोरोनारुग्ण संख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याच्या दुसरा क्रमांक आहे. त्यामुळे कोरोनाला लढा देण्यासाठी पुणे प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध आणखी कठीण केले आहेत. त्यामुळे पुण्यातून बाहेर जाण्याची अथवा पुण्यात येण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत पुण्यात पोलिसांनी एक लग्न लावलं.

पुण्यात आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बीश्त आणि डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह अॅमोनोरा क्लबमधे शनिवारी पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे पुणे पोलिसांनी या विवाहात मुलीचं कन्यादान केलं. मुलाचे वडील सैन्यात कर्नल असून त्यांचं पोस्टिंग सध्या देहरादूनला आहे. तर मुलीचे वडीलही सैन्यात डॉक्टर असून ते नागपूरमध्ये कार्यरत (Pune Police Perform Kanyadan) आहेत.

वर आणि वधू या दोन्ही बाजुच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी थेट स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. दोन्ही सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलीसांनी देखील लॉकडाऊन मधील हे आगळंवेगळं लग्न लावलं.

हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी या लग्नाला हजर होते. पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं (Pune Police Perform Kanyadan).

संंबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्याचा मृत्यूदर काही केल्या घटेना, देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दी

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.