AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनदरम्यान पुणेकरांचा बेशिस्तपणा, 82 हजार जणांवर कारवाई, 33 हजार वाहनं जप्त

पुण्यात कलम 188 अंतर्गत तब्बल 13 हजार 050 गुन्हे दाखल करण्यात (Pune Corona Lockdown Police Action)  आले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान पुणेकरांचा बेशिस्तपणा, 82 हजार जणांवर कारवाई, 33 हजार वाहनं जप्त
| Updated on: Apr 27, 2020 | 8:07 AM
Share

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Pune Corona Lockdown Police Action)  आहे. पुण्यात कोरोना रुग्णांनी 1200 जणांचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांच्या आकड्यांनी शतक ओलांडला आहे. कोरोनाचा विळखा वाढण्यामागे पुणेकरही तितकेच कारणीभूत आहे. लॉकडाऊनदरम्यान पुणे पोलिसांनी तब्बल 82 हजार 631 कारवाई केल्या आहेत. गेल्या महिन्याभरातील या कारवाईवरुन यावरुन पुणेकरांना बेशिस्तपणा समोर येत आहे.

पुण्यात कलम 188 अंतर्गत तब्बल 13 हजार 050 गुन्हे दाखल करण्यात (Pune Corona Lockdown Police Action)  आले आहेत. तर 33 हजार 361 वाहने जप्त केले आहेत. त्याचबरोबर 34 हजार 743 नोटीसा बजावल्या आहेत. तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 778 आणि मास्क न वापरणाऱ्या 699 नागरिकांवर कारवाई केली. ही कारवाई अजूनही सुरु असून याचा आकडा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात आता 1646 एसपीओ नियुक्त करण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र काही पुणेकर किरकोळ कारणास्तव नियमांचा भंग करून मोकाट फिरताना दिसतात. त्यामुळे प्रशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतेय. मात्र अशा मोकाट फिरणाऱ्यामुळे त्यामध्ये बाधा येत आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजारच्या पुढे

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या संसर्गाच्या केंद्रभागी मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक येतो. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. रविवारी (26 एप्रिल) जिल्ह्यात 80 नवीन रुग्णांची वाढ झाली.

यासह पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा तब्बल 1 हजार 264 वर पोहचला आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात दिवसभरात 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा 77 वर पोहचला (Pune Corona Lockdown Police Action)  आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबईत दाखल कोरोना रुग्ण ट्रक आणि पायी प्रवास करत थेट भिवंडीत, आरोग्य यंत्रणाही चक्रावली

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1264 वर, मृतांचा आकडाही वाढला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.