येरवाड्यातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली, नातेवाईक पोलीसही उपस्थित, 8 जणांना अटक

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी आणि जमीर मुलानीची रॅली निघाली होती. रॅलीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस शरीफ मुलानीचाही सहभाग होता.

येरवाड्यातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली, नातेवाईक पोलीसही उपस्थित, 8 जणांना अटक
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 9:36 PM

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यातील (Pune Yerwada Prisoner Rally) गुन्हेगारीत वाढ झाली आहे. एवढेच नाही, तर आता कारागृहातून सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यासही सुरुवात झाली आहे. येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यात (Pune Yerwada Prisoner Rally) आली होती.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी आणि जमीर मुलानीची रॅली निघाली होती. रॅलीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस शरीफ मुलानीचाही सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनी शरीफसह आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईत तीन कार, गावठी पिस्तूल, काडतूससह तब्बल 33 लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींची रॅली काढणारे अटकेत आणि पॅरोलवर सुटलेले आरोपी मात्र फरार झाले आहेत.

येरवडा कारागृहाच्या बाहेर शुक्रवारी (29 मे) सायंकाळी आरोपींची रॅली निघाली होती. फॉर्च्युनर, स्विफ्ट आणि स्कॉर्पिओसह आरोपींचा ताफा निघाला (Pune Yerwada Prisoner Rally). या ताफ्याबरोबर 20 ते 25 दुचाकींवर 30 ते 40 जणांचे टोळके गोंधळ घालत सहभागी झाले होते. आरोपीचे भाऊ नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी रॅली काढली होती. बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला‌. रॅलीतील हुल्लडबाजांनी मास्कही वापरला नव्हता.

याबाबतची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गाड्यांमध्ये एका गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस लोखंडी बार जप्त केला. कारवाईत 8 जणांना अटक झाली असून मुख्य आरोपीसह इतर आरोपी फरार (Pune Yerwada Prisoner Rally) आहेत.

संबंधित बातम्या :

Mumbai Lockdown | बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, एकाला अटक

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.