राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार? सौरव गांगुली म्हणतो…

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. बीसीसीआयने कोचिंग स्टाफसाठी नोकरीचे अर्ज प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चादेखील सुरु आहेत.

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार? सौरव गांगुली म्हणतो...
sourav ganguly and Rahul dravid
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 1:47 PM

मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. बीसीसीआयने कोचिंग स्टाफसाठी नोकरीचे अर्ज प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चादेखील सुरु आहेत. याबाबत विचारले असता बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली म्हणाला की, राहुल द्रविडने थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे अजून काही निश्चित नाही. (Rahul Dravid has asked for time, will apply for India head coach if he wants – Sourav Ganguly)

आज तक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाविषयी सांगितले. सौरव गांगुली राहुल द्रविडबद्दल म्हणाला की, अजून काही निश्चित नाही. जर त्याला अर्ज करायचा असेल तर तो करेल, कारण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

सौरव म्हणाला की, सध्या तो एनसीएचा प्रशिक्षक आहे, ज्याची भारतीय क्रिकेटमध्ये मोठी भूमिका आहे. भारतीय प्रशिक्षकपदासाठी आम्ही आधी त्याच्याशी बोललो होतो, पण त्याला रस नव्हता, अजूनही तशीच परिस्थिती आहेत. मात्र त्याने काही वेळ मागितला आहे.

सौरव गांगुली म्हणाला की, जर तुमच्याकडे राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, रोहित शर्मा अशी नावे असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. अशा परिस्थितीत त्यांचा भारतीय क्रिकेटसाठी वापर करणे आवश्यक आहे.

T-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय नवीन कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनू शकतो. तसेच त्याच्या आवडीचे कर्मचारीही सहभागी होऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. बीसीसीआयने काढलेल्या नोकरीच्या अर्जानुसार 26 ऑक्टोबरपर्यंत कोणीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतो.

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत

टीम इंडियासोबतचा करार संपल्यानंतर रवी शास्त्री काय करणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. टी – 20 विश्वचषकानंतर, जेव्हा ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडतील, तेव्हा त्यांच्या भविष्याचे काय होईल, यावरुन आता पडदा हटू लागला आहे. रवी शास्त्रींबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचीही योजना स्पष्ट असल्याचे दिसते. राठोड सध्या प्रमोशनकडे डोळे लावून बसले आहेत. ते रवी शास्त्रींची खुर्ची मिळवण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. ते लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती आहे.

रवी शास्त्री यांच्याबद्दल अशी बातमी आहे की, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची खुर्ची सोडल्यानंतर ते कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील होतील किंवा त्यांच्या जुन्या व्यवसायात प्रवेश करतील अर्थात कॉमेंट्री क्षेत्रात.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री

(Rahul Dravid has asked for time, will apply for India head coach if he wants – Sourav Ganguly)

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.