AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री

यंदा टी20 विश्वचषकात खेळणाऱ्या नामिबीया संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुपर 12 फेरीत स्थान मिळवले आहे. आयर्लंड संघाला 8 विकट्सने मात देत त्यांनी सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे.

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री
नामिबीया संघ
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:47 PM
Share

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) सामने अगदी चुरशीत  सुरु आहेत.  ग्रुप स्टेजेसचे सामने संपले असून आता उद्यापासून (23 ऑक्टोबर) सुपर 12 फेरीचे सामने सुरु होतील. पण या सामन्यांपूर्वीच आज एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. टी2o विश्वचषकाच्या इतिहासांत प्रथमच नामिबीया क्रिकेट संघ (Namibia Cricket team in super 12) सुपर 12 फेरीत पोहचण्यात यशस्वी झाला आहे. स्कॉटलंड पाठोपाठ नामिबीयाचा संघही भारत असलेल्या ग्रुप 2 मध्येच गेला आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्ताननंतर आता स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत.

आयर्लंड आणि नामिबीया यांच्यातील आजच्या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत आयर्लंड संघाने फलंदाजी निवडली. पण स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंजाजी करत आयर्लंडचा गाडा 125 धावांवर रोखला यावेळी सलामीवीर स्टर्लिंग आणि केविन यांनी अनुक्रमे (38) आणि (25) धावा केल्या. त्यानंतर केवळ बालबिर्ने याने 21 धावा केल्या असून पुढील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ज्यामुळे सर्व संघ 125 धावांच करु शकला.

एरासमसचं अप्रतिम अर्धशतक आणि नामिबीया विजयी

126 धावांचे सोपे आव्हान नामिबीया संघाने केवळ 2 विकेट्स गमावत 18.3 षटकांत पूर्ण करत विजय मिळवला. यावेळी सलामीवीर विल्यम्स आणि ग्रीन यांनी अनुक्रमे 15 आणि 24 धावा करत चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बाद झाल्यानंतर फलंदाज जेरहार्ड एरासमसने दमदार अर्धशतक लगावत नाबाद 53 धावा ठोकल्या. ज्यामुळे संघाचा विजय सोपा झाला. त्याला डेविड विस्से याने नाबाद 28 धावांची साथ देत संघाला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. आता नामिबियाचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंड संघाशी असेल. तर 8 नोव्हेंबर रोजी भारताशी देखील नामिबीयाचा संघ दोन हात करणार आहे.

हे ही वाचा-

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ संघ घेऊन खेळल्यास विजय सोपा, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अंतिम 11

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(In T20 world Cup 2021 Ireland vs Namibia match Namibia won with 8 wickets and enters in Super 12)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.