Ayodhya verdict : अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे 20 महत्त्वाचे मुद्दे

सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) होईल, असा निर्णय दिला.

Ayodhya verdict : अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे 20 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Nov 09, 2019 | 11:48 AM

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

कोर्टाने पुरातत्व विभागाच्या नोंदी, दस्तावेज आणि शेकडो वर्षांचे पुरावे तपासून हा निकाल दिला. आज सकाळी 10.30 वा. कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी तिसरा पक्ष शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरील दावा फेटाळून लावला. त्यामुळे रामलल्ला विरुद्ध सुन्नी वक्फ बोर्ड हे दोनच पक्षकार उरले.

कोर्टाने पुढे निकाल वाचत ऐतिहासिक संदर्भ, नोंदींचा दाखला देत निकाल वाचन केलं.

“शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला. मशीद कधी बांधली याची माहिती नाही, पण बाबराच्या काळात बांधकाम झालं. मोकळ्या जागेवर बाबरी मशीद बांधलेली नाही. मशिदीच्या खाली वास्तू होती, ती वास्तू इस्लामिक नव्हती. मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही.

इंग्रजांच्या आधीपासून सीता रसोई, चबुतरा होते. मात्र, 1528 पासून मुस्लीम नमाज पठन करायचे हे सिद्ध नाही. 1856 पर्यंत हिंदू आतील भागातही पूजा करत होते. इंग्रजांनी कठडा उभारल्यानंतर बाहेरील भागात पूजा करु लागले. सुनी वक्फ बोर्डाला आपला दावा सिद्ध करण्यात अपयश. वादातील जमिनीचे त्रिभाजन अयोग्य ठरवले. चबुतरा आणि परिसरावर हिंदूंचा दावा योग्य.मुसलमानांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश. रामलल्ला विराजमानचा दावा योग्य. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच” असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.

अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे 20 महत्त्वाचे मुद्दे

1)अयोध्या प्रकरणात सहभागाचा  शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

2) अयोध्या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

3) रामलल्ला विराजमान पक्षकार असण्यास मान्यता

4)अय़ोध्येतील मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती

5) मशिदीच्या बांधकामाखाली सापडलेले अवशेष गैरमुस्लिम वास्तूचे

6)पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष नाही

7)इंग्रजांच्या आधीपासून सीता रसोई, चबुतरा होते

8)मात्र, १५२८ पासून मुस्लीम नमाज पठन करायचे हे सिद्ध नाही

9) १८५६पर्यंत हिंदू आतील भागातही पूजा करत होते,

10) इंग्रजांनी कठडा उभारल्यानंतर बाहेरील भागात पूजा करु लागले

11) सुनी वक्फ बोर्डाला आपला दावा सिद्ध करण्यात अपयश

12)वादातील जमिनीचे त्रिभाजन अयोग्य ठरवले

13) चबुतरा आणि परिसरावर हिंदूंचा दावा योग्य

14)मुसलमानांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश

15)रामलल्ला विराजमानचा दावा योग्य

16)अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच

17) मुस्लिम समाजाला अय़ोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेश

18)अयोध्येत श्रीराममंदिर निर्मितीसाठी विश्वस्त संस्थेचे सरकारला आदेश

19) केंद्र सरकारला विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून मंदिर निर्मितीचे आदेश

20) अखेर शतकांचा संघर्ष निकाली, अयोध्येत श्रीराम मंदिर साकारणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.