रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ : गोविंदगिरी महाराज

रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. या संदर्भात प्रयागमधील संत महंत बैठकीत निर्णय घेण्यात आला. साधारण दोन वर्षात हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ : गोविंदगिरी महाराज

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता राम मंदिराची निर्मिती दृष्टीपथात आली आहे (Ram Mandir Built Up). रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. या संदर्भात प्रयागमधील संत महंत बैठकीत निर्णय घेण्यात आला. साधारण दोन वर्षात हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मंदिराच्या लढ्यात कार सेवकांचे योगदानही मोठं आहे त्यामुळे मंदिर परिसरात स्मारकाच्या माध्यमातून स्मृती जागवल्या जाणार असल्याचं विश्वस्त गोविंदगिरी महाराज यांनी सांगितलं (Ram Mandir Built Up).

गेल्या वीस वर्षांपासून मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या पाषाणाला घडवायचं काम सुरु आहे. 85 टक्के पेक्षा जास्त काम झालं असून दोन वर्षाच्या आत मंदिर पूर्ण होणार असल्याचे गोविंद गिरी महाराज यांनी सांगितले.

हा भारताच्या इतिहासातील मंगलमय क्षण असून रामाच्या भव्य मंदिरासाठी अनेक शतकांचा लढा सुरु होता. हा लढा आता संपला असून ज्या सरकारने हे काम केलं त्यांचं अभिनंदन गोविंद गिरी महाराजांनी व्यक्त केलं. सर्वजण भारताचे नागरिक असून देशाचा प्राण रामचंद्र आहे. महात्मा गांधी देखील राम नामाचा जप करत होते. त्यामुळे आजचा क्षण महत्वाचा आहे. भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. विश्वस्त पदी माझी निवडही भगवंताची कृपा असून खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं.

“या संदर्भात जय पराजय असा भाग नाही. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारला असून राम मंदिरासोबतच राम मंदिर उभारण्याचा संकल्प करुया. अजिंक्य, वैभवशाली संपन्न देश उभारण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केलं. रामाने मानवतेचा संदेश दिला असून सर्वांनासोबत घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेतली”, असंही गोविंद गिरी महाराजांनी सांगितलं.

“या निर्णयाचे 97 टक्के लोक आनंदाने स्वागत करत आहेत. तर काही लोकांना भडकावून एखादा विरोधी स्वर लावला, तर ते महत्वाचं ठरत नसल्याचं गोविंद गिरी महाराजांनी म्हटलं. काहींचं नेतृत्व काही लोकांना भडकवल्या शिवाय जिवंत राहू शकत नाही. या लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. 98 टक्के पेक्षा जास्त समाज मंदिरासाठी सहयोग करतोय. हे मंदिर राष्ट्रीय एकात्मता आणि भारताच्या विजय पर्वाच प्रतीक आहे”, अशी भावना गोविंद गिरी महाराजांनी व्यक्त केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI