राऊतांचे वक्तव्य ऐकुण किव येते, राजकारणासाठी किती लाचारी; बाळासाहेब असते तर थोबाडीत दिली असती, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

राऊतांचे वक्तव्य ऐकुण किव येते, राजकारणासाठी किती लाचारी; बाळासाहेब असते तर थोबाडीत दिली असती, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:11 PM

नाशिकः संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये भाजपची बडी मंडळी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आली आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा येथील कथित घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेला घेरले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल केला होता. पाटील यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती, अशी घणाघाती टीका केली.

पाटील पुढे म्हणाले की, राज्य करा. मुस्लिमांची मतं मिळवा. कोण नाही म्हणतंय. 5 टक्के मुस्लिम गडबड करतात. 95 टक्के प्रामाणिक आहेत. मालेगावमध्ये,नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यावर पूर्वी सारखी टीका करा. फक्त मुस्लिम मतांची काळजी करू नका. 5 टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार ?, असा सवाल त्यांनी केला. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत ही परंपराच आहे ना. मग हा निषेध शांततेत करा इतकंच. अमरावतीचा कालचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्री जगदीश गुप्तांचे ऑफिस फोडले गेले की नाही? सामान्य माणसाचे ऑफिस फोडले गेले की नाही? आज बंदवर पोलीस लाठ्या चालवतील. मात्र, काल ज्यांनी दुकान फोडले त्यांच्यावर लाठ्या का नाही चालवल्या, असा सवालही पाटील यांनी यावेळी केला.

भाजपचा हात कापून काढा

पाटील म्हणाले, तुम्हाला झोपताना, उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला. आरोग्य पेपर आम्हीच फोडला. शेतकरी पैसे आम्ही थांबवले. अरे काय चेष्टा चाललीय. सामान्य माणसाला कळत नाही काय? सगळीकडे भाजपचा हात मग तुम्ही 3 पक्ष समर्थ आहात ना ? भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत. सरकारने हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर पद जातील. माजी गृहमंत्री जेलमध्ये आहे. एक गृहमंत्री आता आजारपणातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत ना, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुस्लिमांची मतं मिळवा. कोण नाही म्हणतंय. 5 टक्के मुस्लिम गडबड करतात. 95 टक्के प्रामाणिक आहेत. मालेगावमध्ये, नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यावर पूर्वी सारखी टीका करा. फक्त मुस्लिम मतांची काळजी करू नका. 5 टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार ?

-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

(Raut’s statement comes as a shock, how helpless he is for politics; Criticism of Chandrakant Patil)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.