महाराष्ट्राची ‘आर्ची’ रिंकू राजगुरु सध्या काय करते?

महाराष्ट्राची 'आर्ची' रिंकू राजगुरु सध्या काय करते?

मुंबई : महाराष्ट्रच नाही, तर देशाला वेड लावणाऱ्या सैराट सिनेमाचा सिक्वल येणार असल्याचं बोललं जातंय. या सिनेमाच्या नावाचीही नोंदणी झाली आहे. सिनेमातील जोडी आर्ची-परशा म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकाला अक्षरशः वेड लावलं होतं. महाराष्ट्रात तर सैराट नावाची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती. सैराट सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी रिंकू सध्या काय […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : महाराष्ट्रच नाही, तर देशाला वेड लावणाऱ्या सैराट सिनेमाचा सिक्वल येणार असल्याचं बोललं जातंय. या सिनेमाच्या नावाचीही नोंदणी झाली आहे. सिनेमातील जोडी आर्ची-परशा म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकाला अक्षरशः वेड लावलं होतं. महाराष्ट्रात तर सैराट नावाची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती.

सैराट सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी रिंकू सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. याचं उत्तर आम्ही थेट रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांच्याकडूनच जाणून घेतलंय. महाराष्ट्राची आर्ची सध्या पुण्यात एका सिनेमाची शुटिंग करण्यात व्यस्त आहे. या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं नाही. वाचाप्रिन्स मामाचा बदला घ्यायला आर्ची-परशाचं पोरगं येणार!

एवढंच नाही, अनेक दिवसांपासून टीव्हीवर न दिसलेली रिंकू लवकरच आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 14 फेब्रुवारीला रिंकूचा कागर हा सिनेमा रिलीज होतोय. मकरंद माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे रिंकू आणि कागर सिनेमाचे दिग्दर्शक दोघेही अकलूजचेच आहेत आणि दोघांनाही एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मकरंद माने यांना रिंगण सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सर्वांना माहित आहे, की रिंकू दहावीच्या परीक्षेत पास झाली होती. यानंतर तिने कला शाखेला प्रवेश घेतलाय. अकलूजमध्ये 17 नंबर फॉर्म भरुन ती यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. अभ्यासाची चिंता असली तरी रिंकूने सध्या सिनेमावर लक्ष केंद्रीत केलंय.

आकाश ठोसर सध्या काय करतो?

सैराटच्या यशानंतर आकाश ठोसरला हिंदी सिनेमातूनही ऑफर मिळाल्या. त्याने सैराटसह दोन मराठी सिनेमात, तर एका हिंदी सिनेमात काम केलंय. महेश मांजरेकर यांच्या एफयू या सिनेमात त्याने काम केलं, त्यानंतर लस्ट स्टोरी या हिंदी सिनेमात त्याने भूमिका साकारली. तो आता गुली बॉय या हिंदी सिनेमात काम करत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें