AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघे अटकेत

शिवसेना पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुतण्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची काल रात्री हत्या केली

राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघे अटकेत
आरोपी दिनकर पाटील
| Updated on: Feb 07, 2020 | 9:27 AM
Share

सांगली : सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात अटक (Manohar Patil Murder Accuse Arrest) करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख दिनकर बाळासो पाटील यांच्यासह तिघांचा समावेश आहे.

सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी हत्येनंतर अवघ्या काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. शिवसेना पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुतण्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची काल रात्री हत्या केली होती.

हत्येप्रकरणी दिनकर बाळासो पाटीलसह अभिजीत युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक झाली आहे. पूर्ववैमनस्यातून मनोहर पाटील यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.

                                                                मयत मनोहर पाटील

मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. हरोली- देशिंग भागातील शेतात हल्लेखोरांनी वार करुन त्यांची हत्या केली होती. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मनोहर पाटील यांना उपचारासाठी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्यांना मृत घोषित केलं होतं.

आठवड्याभरातील दुसरी हत्या

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले नसताना राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होते.

दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपी वेगवेगळे आहेत. सांगलीतील वेगवेगळ्या तालुक्यात हत्या घडल्या असल्या, तरी दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाले आहेत. राजकीय नेत्यांचेच हत्याकांड घडत असल्याने जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं (Manohar Patil Murder Accuse Arrest) आहे.

संबंधित बातमी:

अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.