सांगली पोलिसांकडून 600 मजुरांना जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात (Sangli police help laborer) आली आहे.

सांगली पोलिसांकडून 600 मजुरांना जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 10:37 AM

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात (Sangli police help laborer) आली आहे. यादरम्यान पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. तसेच रसत्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीने फटके दिले जात आहेत. यावरुन अनेकजण पोलिसांवर टीका करत आहेत. पण याच दरम्यान सांगलीमध्ये पोलिसांनी तब्बल 600 मजुरांसाठी जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले (Sangli police help laborer) जात आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्वत्र बंद आहे. त्यामुळे मजुरांचे जेवणाचे हाल होत आहेत. अनेक मजूर चक्क चालत आपल्या घराकडे जाण्यास निघाले आहेत. पण राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्याने मजुरांना आपल्या घराकडे जाता येत नाही. अशाच कठीण परिस्थितीत पोलिसांनी मजुरांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे.

पोलिसांनी सांगलीमधील मिरज आणि एमआयडीसी परिसरातीलल 600 मजुरांना एका ठिकाणी बोलावलं. तसेच मोठ्या क्रीडांगणावर सर्व मजुरांना पाच फुटांवर बसवून मार्गदर्श केले. तसेच सर्वांची आरोग्य तपासणी केली.

राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांकडून फुटपाथवर राहणारे, गरीब लोकांना मदत केल्याचे फोटो आणि व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामुळे नेहमीच पोलिसांकडून लाठी नाही तर मदतीलाही हात मिळतो, हे या घटनेतून समोर आलं आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात सध्या एक हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात 200 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.