AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palkhi Sohala 2020 | देहूनगरीत भक्तिरसाचा सोहळा, संत तुकोबांच्या पादुकांचे ऐतिहासिक नीरा स्नान संपन्न

परंपरेत खंड पडू नये, म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करुन ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. (Sant Tukaram Maharaj Paduka Neera Snan in Dehu)

Palkhi Sohala 2020 | देहूनगरीत भक्तिरसाचा सोहळा, संत तुकोबांच्या पादुकांचे ऐतिहासिक नीरा स्नान संपन्न
| Updated on: Jun 26, 2020 | 11:12 AM
Share

पिंपरी चिंचवड : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ‘कोरोना’च्या सावटाखाली पार पडत आहे. तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे नीरा स्नान पार पडले. (Sant Tukaram Maharaj Paduka Neera Snan in Dehu)

‘कोरोना’मुळे वारीतील बहुतांश प्रथा-परंपरांना छेद देण्यात आला. मात्र अनेक सोहळे रद्द झाले असताना परंपरेनुसार आज संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान पार पडले.

पुणे जिल्ह्यातून कोळी समाजाच्या होडीने तुकाराम महाराजांची पालखी नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, तेव्हा इथे पादुकांना स्नान घालण्याचा प्रघात आहे. या परंपरेत खंड पडू नये, म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करुन ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला.

संत तुकाराम महाराज संस्थानने रात्री जाऊन हंडाभरुन पाणी आणले. देहूमधील इंद्रायणी नदीत हा ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडला. पादुका स्नान सोहळ्यासाठी देहू संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. पादुका घेऊन जाण्यासाठी फुलांच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर पवित्र इंद्रायणी नदीमध्ये आरती आणि विधिवत पूजा पार पडली.

मोजक्याच वारकऱ्यासोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमत आहे. मोजके वारी विवेकाची पताका खांद्यावर घेत, वारीची परंपरा जपताना दिसत आहेत.

दरवर्षी इंद्रायणीचा काठ हा लाखो वारकऱ्यांनी गजबलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठूनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात. पण वारकऱ्यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट यंदा शांत आहे.

संबंधित बातम्या : 

तुकोबा- एकनाथांच्या पालख्यांचं प्रस्थान, सोशल डिस्टन्सिंगसह मोजकेच वारकरी

तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज, 50 वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

(Sant Tukaram Maharaj Paduka Neera Snan in Dehu)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.