नक्षलवाद्यांनी पेरलेले बॉम्ब घरी आणले, खेळणे म्हणून खेळताना स्फोट

नक्षलग्रस्त भागात दैनंदिन जगणेही कसे जीवावर बेतत आहे याचे अनेक प्रसंग नेहमीच समोर येत असतात. मात्र, यावेळी शाळकरी मुलांच्याबाबतच एक धक्कादायक प्रकार घडला.

नक्षलवाद्यांनी पेरलेले बॉम्ब घरी आणले, खेळणे म्हणून खेळताना स्फोट


रायपूर : नक्षलग्रस्त भागात दैनंदिन जगणेही कसे जीवावर बेतत आहे याचे अनेक प्रसंग नेहमीच समोर येत असतात. मात्र, यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला. नक्षलवाद्यांनी जंगलात पेरलेले हँड ग्रेनेड बॉम्ब शाळकरी मुलांना दिसल्यानंतर त्यांनी ते खेळणे समजून घरी आणले आणि खेळतानाच त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात दोन मुले गंभीर जखमी झाली आहे.

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील रामपूर गावात काही शाळकरी मुले जंगलातून जात होती. दरम्यान त्यांना वाटेत काही वस्तू दिसल्या. त्यांनी खेळणे म्हणून त्या वस्तू घरी आणल्या आणि खेळायला सुरुवात केली. मात्र, त्या वस्तू म्हणजे नक्षलवाद्यांनी जंगलात पेरलेले हँड ग्रेनेड बॉम्ब होते.

मुले हँड ग्रेनेडसोबत खेळणे म्हणून खेळत असतानाच या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात 2 मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलांवर पांखाजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI