AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलग्रस्त भागात जाणार, तरुणांशी साधणार संवाद

पोलिसांनी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खातमा केलेला असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नक्षलग्रस्त भागात दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलग्रस्त भागात जाणार, तरुणांशी साधणार संवाद
sharad pawar
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 5:35 PM
Share

नाशिक: पोलिसांनी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खातमा केलेला असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नक्षलग्रस्त भागात दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलवादी भागात जाणार आहेत. तशी माहिती स्वत: शरद पवारांनीच दिली आहे.

इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे येथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी ही माहिती दिली. आदिवासी अजूनही विकासापासून दूर आहे. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागेल, असं सांगतानाच अन्याया विरोधात लढणारा आदिवासी नक्षली असूच शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. पुढील आठवड्यात मी स्वत: नक्षली भागात जाणार असून तिथल्या तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भीमा कोरेगावात लढणारा आदिवासी होता

भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली. त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता, असं सांगतानाच बिरसा मुंडा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही

आदिवासी बांधव हे पिढ्यान् पिढ्या देशाचे मूळ मालक आहेत. जल, जमीन आणि पर्यवरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधावाकडून केले जात आहे. त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध कार्यक्रम राबवत आहे, आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. सामाजिक परिवर्तन सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारीही पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत, असे ते म्हणाले.

आदिवासी समाजातील इतर घटक यांच्यात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं. त्यामुळेच ते रयतेच राज्य म्हटले जातात. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जे योगदान स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले त्याचे स्मरण व जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान व पुढच्या पिढीसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही त्यांनी सागितले आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.