सोलापुरात काँग्रेसमध्ये राडा, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्याकडून माईक काढून घेतला

काँग्रेसच्याने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याच्या हातातून माईक काढून घेऊन कार्यकर्त्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला गेला.

सोलापुरात काँग्रेसमध्ये राडा, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्याकडून माईक काढून घेतला
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 10:55 AM

सोलापूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपाकडून लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून नेहमी केला जातो. मात्र काँगेसच्याच कार्यकर्त्याची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडूनच मुस्कटदाबी केल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. विधानसभा उमेदवारीसाठी वाणवा असणाऱ्या सोलापुरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटता मिटत नाही.

काँग्रेसच्याने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याच्या हातातून माईक काढून घेऊन कार्यकर्त्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला गेला. सोलापुरातील काँग्रेस भवनमधील प्रकार असून, बैठकीत सूचना करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकसभेत सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप करत, बोलत असताना शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी माईक काढून घेतला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले म्हणणे मांडत होते. त्यावेळी पक्षाचे विजय शाबादी हे काही सूचना करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी विजय शाबादी यांच्या हातातील माईक काढून घेतला.

लोकसभा निवडणुकीत विजय शाबादी यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेऐवजी तरुण चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केली होती. विजय शाबादी हे सुशीलकुमार शिंदे यांना विरोध करतात मग ते इथे कसे बोलणार म्हणून काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी ते बोलत असताना गोंधळ घातला. हातातील माईक काढून घेतल्यानंतर विजय शाबादी यांनी बैठक सोडून बाहेर पडण्यात धन्यता मानली.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.