मालिका, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे (Guidlines for film and tv serials shooting).

मालिका, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 6:31 PM

मुंबई : राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे (Guidlines for film and tv serials shooting). यासाठी सरकारकडून 30 मे 2020 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना काही संस्था किंवा संघटनांना अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे (Guidlines for film and tv serials shooting).

“लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत. राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले.

“चित्रपटसृष्टीतील संस्थांनी सर्व सूचनांनुसार कार्यवाही करावी. सर्व निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक 20200624110937823 असा आहे, अशी सूचना राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आली आहे.

मार्गदर्शक तत्वे काय आहेत?

1. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांना 30 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करुन दिलेल्या एस ओ पी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाऊनपूर्वी चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.

2. लॉकडाऊनपूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती आताही तीच पद्धत असणार आहे. चित्रीकरण करत असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरुपात कळविणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Maharashtra Cabinet Decision : आशा सेविकांचं मानधन 3 हजारांवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे 12 निर्णय

3. प्रतिबंधित क्षेत्र नसलेला भाग आणि निषीद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी लॉकडाऊनबाबत दिलेल्या निर्णयांचे पालन करणे आवश्यक राहील.

4. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे संबंधित निर्मिती संस्था आणि निर्माते यांची असेल. चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे की नाही, याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी (लायसेन्स ऑथॉरिटी) यांच्यामार्फत करण्यात येईल.

5. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवून चित्रीकरण करू शकतात, संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित निर्मात्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे लॉकडाऊन संदर्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.

6. थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रिकरणच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या स्थळी जवळील कोरोना रुग्णालये याची माहिती, दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेला असणे आवश्यक आहे. तसेच निर्मिती संस्थेने एक स्वतंत्र वाहन आरक्षित करुन ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून जर एखादा संशयित रुग्ण चित्रीकरणाठीकाणी आढळल्यास त्याला रुग्णालयात नेणे सोयीस्कर होईल. तसेच या वाहनात प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्यक आहे.

7. राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचना या कलाकार, तंत्रज्ञ, मदतनीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे.

8. चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करुन दक्षता घेण्याच्या सूचना देणे

9. चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्यसेतू ॲप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रिकरण स्थळांचे सॅनिटायझेशन याबाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : ‘फेअर अँड लव्हली’चा ‘फेअर’ जाणार, हिंदुस्थान युनिलिव्हरकडून नाव बदलण्याची घोषणा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.