CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

CBSE आणि ICSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Nupur Chilkulwar

|

Jun 25, 2020 | 3:26 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा शिक्षणालाही (CBSE ICSE Board Exams) बसला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांनंतर आताCBSE आणि ICSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा निर्णय दिला आहे.  येत्या 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला (CBSE ICSE Board Exams).

जुन्या परीक्षानिकालाच्या आधारावर मुल्यांकन करुन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. CBSE परीक्षांबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र दाखल केलं आहे. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात कोरोना महामारी संपत नाही, तोपर्यंत कुठल्याही परीक्षा घेतल्या जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली.

दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू सरकारने आधीच केंद्र सरकारला कळवले आहे की परीक्षा घेण्याची योग्य वेळ नाही. यामुळे आम्ही परीक्षा घेण्यास असक्षम आहोत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. परिस्थितीत सुधारणा झाल्यावरच परीक्षा घेतल्या जाणार आहे (CBSE ICSE Board Exams).

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, इंजिनिरिंग, फार्मसी, आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आहे. ATKT चा अजून निर्णय घेतला नाही. मात्र सरकारने त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे, त्यावर कुलगुरु निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

CBSE ICSE Board Exams

संबंधित बातम्या :

अमित ठाकरेंच्या मागणीनंतर ठाकरे सरकारची वेगवान पावले, एमडी-एमएस परीक्षा पुढे ढकलण्याची मोदींना विनंती

Online Education | शाळेत, घरुन कसं काम करावं, शिक्षकांसाठी मुंबई महापालिकेची नियमावली

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें