AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पावसातल्या सभेवेळी एकटा कॅमेरावाला होता, म्हणाला दीड लाखाचा आहे, भिजला तर भरुन पाहिजे”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक सभेविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

पावसातल्या सभेवेळी एकटा कॅमेरावाला होता, म्हणाला दीड लाखाचा आहे, भिजला तर भरुन पाहिजे
| Updated on: Feb 19, 2021 | 8:45 PM
Share

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक सभेविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. शरद पवार यांच्या पावसातील सभेनंतर राज्यातील लाखो लोकांच्या स्टेटसला लागलेला फोटो कसा आणि कुणी काढला हे सांगताना त्यांनी त्या दिवशीचा मजेदार किस्सा सांगितला. तसेच फोटो काढणाऱ्या कॅमेरामनने आपल्या दीड लाख रुपये भरुन देण्याबाबत कशी विचारणा केली हेही सांगितलं (Supriya Sule explain how cameraman of NCP media care for his Camera while shooting in Satara).

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. त्या ठिकाणी माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, रद्द होईल असा विचार करुन सर्व पत्रकार निघून गेले होते. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडिया सेलचा माणूस तेथे होता. त्याने शशिकांत शिंदेंना फोन केला सभा होणार आहे की नाही. त्यावर शशिकांत शिंदेंनी सभा होणार आहे असं सांगितलं. तो म्हणाला माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात माझा कॅमेरा खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल असं तो कॅमेरावाला म्हणाला. शशिकांत शिंदेंनी कॅमेरा भरुन देण्याचं आश्वासन देत शुटिंग करायला सांगितली.”

“तो कॅमेरामन दीड लाख रुपयांचा कॅमेरा पावसात घेऊन काळजीने बसला आणि या देशातला टर्निंग पॉईंटचा सर्वात मोठा फोटो त्या कॅमेरावाल्याला मिळाला. नियतीच्या मनात काय असतं ते कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढला तर त्याचा परिणाम चांगला होता,” असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“साताऱ्याच्या सभेच्या दिवशी शशिकांत शिंदेंनी माफी मागायला फोन केला”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “साताऱ्यात शरद पवार यांची सभा होती तेव्हा मला शशिकांत शिंदे यांचा फोन आला. त्यांनी ताई मी सॉरी म्हणायला फोन केलाय असं सांगितलं. मला काळजी वाटली, कशाबद्दल सॉरी हे कळालं नाही. मी काय झालंय हे विचारलं. ते म्हणाले आम्ही सभा केली आणि साहेब त्यात पूर्ण भिजले. मी कपाळाला हात लावला. मी कपाळाला हात लावून त्यांना सांगितलं माझे वडील 80 वर्षांचे आहेत, पायाला जखम झालीय. मी आणि शरद साहेबांनी ठरवलं लढेंगे तो पुरी ताकदसे लढेंगे, नही तो नही.”

हेही वाचा :

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

व्हिडीओ पाहा :

Supriya Sule explain how cameraman of NCP media care for his Camera while shooting in Satara

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.