रिया चक्रवर्तीचा कोठडीतील मुक्काम वाढला; तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दूल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलंतरा आणि सॅम्युअल मिरांडा यांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्र न्यायालयात हजर केले होते.

रिया चक्रवर्तीचा कोठडीतील मुक्काम वाढला; तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई: ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामिन अर्ज सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला असून तिच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रियाच्या कोठडीतील मुक्कामात वाढ झाली आहे. (Rhea Chakraborty’s judicial custody extended till October 20)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दूल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलंतरा आणि सॅम्युअल मिरांडा यांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्र न्यायालयात हजर केले होते. या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत होती. त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली असता रियासह या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयातून दिलासा मिळणार?

दरम्यान, रिया आणि तिचा भाऊ शौविकने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 30 सप्टेंबर रोजी या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायाधीश सारंग व्ही. कोतवाल यांनी त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. याबाबत आज निर्णय येण्याची शक्यता असून रियाला कोर्टाकडून दिलासा मिळणार की नाही हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

रिया आणि शौविकवर ड्रग्ज सिंडिकेट चालवण्याचा आरोप आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयच्या चौकशीत ड्रग्जचा अँगल समोर आला होता. त्यानुसार एनसीबीने याप्रकणी चौकशी सुरू केली होती. त्यात हे दोघेही ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं होतं. हे दोघेही सॅम्युअर मिरांडाच्या माध्यमातून डॅग्ज खरेदी करून सुशांतला देत होते. दरम्यान, ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. त्याशिवाय ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूलप्रीत सिंह सारख्या बड्या कलाकारांचीही चौकशी करण्यात आली होती. (Rhea Chakraborty’s judicial custody extended till October 20)

संबंधित बातम्या:

(Rhea Chakraborty’s judicial custody extended till October 20)

Published On - 2:11 pm, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI